Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी२० विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी न्यूझीलंडला पाहावी लागणार वाट!

January 21, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
aus-nz

Photo Courtesy: Twitter/ICC


जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. भारतातसुद्धा या आजाराची तिसरी लाट आली असून, अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचा परिणाम क्रिकेटवर देखील झाला आहे. भारताप्रमाणे इतर देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून, यामुळे एक महत्त्वपूर्ण एकदिवसीय मालिका रद्द करण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंडचा २४ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणारा ऑस्ट्रेलिया दौरा स्थगित करण्यात आला आहे. न्यूझीलंड क्रिकेट आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सरकारपुढे दौऱ्याची मुदत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जेणेकरून न्यूझीलंड संघ MIQ प्रक्रियेसाठी वेळेत मायदेशी परतू शकेल. परंतु सरकारजवळ ही विनंती पूर्ण करण्याची क्षमता नाही, अशी माहिती देण्यात आली. आता पुढे ढकललेले सामने कधी खेळवले जाणार याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा सुरु आहे.

न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य अधिकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले की, “हा दौरा सुरुवातीला गेल्यावर्षी नियोजित केला होता, ज्याला सरकारने ट्रान्स-टास्मान सीमेशी संबंधित MIQ निर्बंध लादण्याच्या आपला इराद्याचे संकेत दिले होते. डेव्हिड व्हाईट यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “ओमिक्रॉनने सरकारला आपली रणनीती बदलण्यास प्रवृत्त केले. परिणामी सर्व येणाऱ्या प्रवाशांना १० दिवसांसाठी क्वारंटाइन अनिवार्य केले आहे.”

न्यूझीलंड क्रिकेट आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दौरा पूढे ढकलण्याचा आणि न्यूझीलंड संघाला परत येण्याची तारीख पुढे ढकलण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण, बुधवारी सकाळी माहिती मिळाला की, ते याची निश्चितता देऊ शकत नाहीत.

येत्या २४ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान नियोजित असलेल्या या दौऱ्यात पर्थ, होबार्ट आणि सिडनी येथे तीन एकदिवसीय सामने आणि कॅनबेरा येथे एका टी२० सामन्यांचा समावेश आहे. तसेच ११ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरुद्ध पाच टी२० सामने खेळणार आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विराटने कर्णधारपद सोडताच पहिले स्थानही गमावले!! आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचे मोठे नुकसान (mahasports.in)

पृथ्वीने दिला लहाणपणीच्या आठवणींना उजाळा; सांगितली वडिलांची क्रिकेटबद्दलची आत्मीयता (mahasports.in)

वाढदिवशीच अक्षर झाला एंगेज! ‘फिल्मी स्टाइल’ प्रपोज करत घातली मेहाला मागणी (mahasports.in)


ADVERTISEMENT
Next Post
virat-kohli

विराटने राजीनामा देत फसवला बीसीसीआयचा प्लॅन? धक्कादायक योजनेचा झाला खुलासा

jason-roy

रॉयचा वेस्ट इंडिजमध्ये 'राडा'! २४५ च्या स्ट्राईक रेटने ठोकले वादळी शतक; मेगा लिलावात...

ruturaj-gaekwad

"...आता तरी ऋतुराजला संधी द्या"

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.