भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) गुरुवारी (२० जानेवारी) आपला २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. हा वाढदिवस आणखी संस्मरणीय बनवत त्याने आपल्या साखरपुड्याची माहिती सोशल मीडियावरून दिली. त्याने आपली मैत्रीण मेहा हिच्याशी साखरपुडा झाल्याची जाहीर केले. (Axar Patel Engagement)
अक्षर पटेल याने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून काही छायाचित्रे शेअर केली. यामध्ये तो आपली मैत्रिण मेहा हिला प्रपोज करताना दिसत आहे. अतिशय फिल्मी स्टाइलने प्रपोज केल्यानंतर दोघांनी एकमेकांना अंगठी घातल्याचे छायाचित्र पोस्ट केले. गुजरात संघाचा त्याचा सहकारी चिंतन गजा याने सर्वप्रथम आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून ही माहिती सार्वजनिक केली होती. (Axar Patel Engagement Meha)
२०२१ साल बनले संस्मरणीय
अक्षर पटेल याच्यासाठी २०२१ हे वर्ष अत्यंत खास राहिले आहे. त्याने या वर्षी कसोटी पदार्पण करत अत्यंत शानदार कामगिरी करून दाखवली. तसेच, इंग्लंड व न्यूझीलंड विरुद्ध टी२० मालिकेत सक्षम खेळ दाखवण्यात तो यशस्वी ठरला. तसेच आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्याने दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला रिटेन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-