---Advertisement---

निकोलस पुरनच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे मास्टर ब्लास्टरला आठवला ‘हा’ दिग्गज खेळाडू

---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 38 व्या सामन्यात मंगळवारी (20 ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पुरनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार खेळी केली. त्याने अवघ्या 28 चेंडूत 53 धावा केल्या. त्याची फलंदाजी पाहून मला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जेपी ड्यूमिनीची आठवण आली असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करुन म्हटले आहे.

दिल्लीने दिलेल्या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर केएल राहूल आणि मयंक अगरवाल लवकर तंबूत परतले. त्यानंतर काही वेळातच धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल सुद्धा बाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पुरनने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याने संघाला 5 विकेट्सने विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटाही उचलला.

त्याने केलेल्या या खेळीने सचिन तेंडुलकरही प्रभावित झाला आहे. पुरनच्या या खेळीबद्दल सचिनने ट्विट केले की “पुरनने काही उत्कृष्ट फटके खेळले. तो अचूक फटके मारणारा फलंदाज आहे. त्याची बॅकलिफ्ट आणि स्टान्स पाहून मला ड्युमिनीची आठवण आली.”

जेपी ड्युमिनी हा दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. 2019 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली डेअरडेविल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) या संघांचे प्रतिनिधित्व केले होते.

युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलमध्ये निकोलस पुरनने 10 सामन्यांत 183.22 च्या स्ट्राइक रेटने 295 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 77 आहे. त्याने दोन अर्धशतके ठोकली आहेत. त्याने 21 चौकार आणि 22 षटकार ठोकले आहेत.

मंगळवारी (20 ऑक्टोबर) नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 164 धावा केल्या होत्या. त्यानंतर दिल्लीने दिलेले 165 धावांचे लक्ष्य पंजाबने 19 षटकांत पाच गडी गमावून पूर्ण केले. 10 सामन्यात पंजाबचा हा चौथा विजय होता. संघाकडे आता 8 गुण आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वात पंजाबने आता आयपीएल गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘सलग तिसऱ्या वर्षी वयस्कर खेळाडूंसह खेळणे कठीण’

बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू

आयपीएल २०२०: दिल्ली विरुद्धच्या विजयानंतर पंजाबची पाचव्या क्रमांकावर उडी; पाहा अशी आहे गुणतालिका

ट्रेंडिंग लेख –

ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला

HBD विरू : तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं ! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---