इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटला आयपीएल २०१९मध्ये खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने परवानगी नाकारली आहे. या खेळाडूवर क्रिकेट विश्वचषक २०१९चा ताण असल्याच्या कारणामुळे ही परवानगी नाकारण्यात आली आहे.
कालच या खेळाडूचे नाव बिग बॅश लीगमधील सिडनी थंडरकडून खेळणार असल्याचे घोषीत करण्यात आले होते. पंरतु हा खेळाडू आयपीएलच्या लिलावात भाग घेऊ शकत नाही.
यावर्षीच रुटने आपण आयपीएलसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते परंतु त्याला लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केली नाही. रुट आजपर्यंत ६१ टी२० सामने खेळला असुन त्यात त्याने १४२० धावा केल्या आहेत.
जाॅश बटलरला मात्र आयपीएल खेळण्याबद्दल परवानगी देण्यात आली आहे. सध्या हा २७ वर्षीय खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात देशाकडून खेळताना दिसत आहे. राजस्थान राॅयल्सकडून केलेल्या जबरदस्त कामगिरीचे फळ म्हणुनच त्याला कसोटी संघात स्थान दिल्याचे बोलले जात होते.
बटलर यावर्षी पहिले ४-५ महिने कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळताना दिसला नाही आणि आयपीएलमधून त्याला अचानक बोलविण्यात आले तसेच पाकिस्तान विरुद्ध कसोटी संघात स्थान देण्यात आले होते. तसेच तो आता या संघाचा गेली तीन महिने सदस्य आहे.
३०मेपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट विश्वतषकासाठी अनेक खेळाडू पुढच्या वर्षी आयपीएल अर्ध्यावर सोडून जाताना दिसणार आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-टॉप-५: या खेळाडूंच्या नावावर आहेत शतकांपेक्षा जास्त ‘०’ धावा
– ८२ वर्षांत जे कुणालाही जमले नाही ते विराट ब्रिगेडला करण्याची संधी
– भारताचा फुटबॉलपटू केरळ महापूरग्रस्तांसाठी झाला स्वयंसेवक
–केदार जाधव आणि आंबाती रायडूचा भारताच्या संघात समावेश
–एशियन गेम्स: 28 वर्षांनंतर इराण कबड्डी संघाने जिंकले सुवर्णपदक
–एशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक