इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) उत्तरार्धाला सुरुवात होण्यास चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मे महिन्यात आयपीएलच्या पूर्वार्धात अनेक खेळाडू कोरोनाबाधित आढळल्याने स्पर्धा अर्ध्यातून स्थगित करावी लागलेली. त्यानंतर आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) उर्वरित हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. तर, अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. तत्पूर्वी, गुणतालिकेत अखेरच्या स्थानी असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
प्रमुख विदेशी खेळाडूला नाही मिळाला व्हिसा
आयपीएलची सुरुवात होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना, सनरायझर्स हैदराबादसाठी खेळणारा अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर-रहमान याला व्हिसा न मिळाल्याने तो अद्याप संघात सामील झाला नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुजीब संघात कधी सामील होईल याची पुष्टी झाली नाही. त्याच्या व्हिसासंदर्भात अजूनही काम सुरू आहे आणि या संदर्भातील माहिती लवकरच उघड होईल.
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला दुबई येथे खेळला जाईल. सनरायझर्स हैदराबादची पूर्वार्धातील कामगिरी खराब होती आणि संघ त्यांच्या सात सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकू शकला होता. या कारणास्तव संघ सध्या गुणतालिकेच्या तळाशी आहे.
इतर दोन खेळाडू झाले संघात सामील
अफगाणिस्तान क्रिकेटचे दोन दिग्गज राशिद खान आणि मोहम्मद नबी सनरायझर्स हैदराबाद संघात सामील झाले आहेत. राशिद आणि नबी दोघेही यूएईमध्ये पोहोचले असून, सध्या त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सनरायझर्स व्यवस्थापन दोन्ही खेळाडूंच्या कुटुंबीयांची या काळात वेळी विशेष काळजी घेईल. सध्या अफगाणिस्तानातील राजकीय उलथापालथी दरम्यान या दोन खेळाडूंनी आनंदी राहणे फार महत्वाचे आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना पोषक वातावरण दिले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळलेले ३ दिग्गज आंतरराष्ट्रीय कर्णधार
‘तुझे वय किती?’ प्रश्नाच्या उत्तरावर जेव्हा प्रशिक्षक द्रविडने घेतली दीपक चाहरची फिरकी, वाचा किस्सा
तब्बल ५ वर्षांनी ‘हा’ संघ बांगलादेश दौऱ्यावर जाण्यास तयार, पाहा संपूर्ण वेळापत्रक