सनरायझर्स हैदराबादचा स्पीडस्टार उमरान मलिक आयपीएल २०२२ मध्ये दमदार गोलंदाजी प्रदर्शन करतो आहे. नुकत्याच गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२मधील ४०व्या सामन्यात त्याने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ५ विकेट्स घेतल्या. याच उमरान मलिकची न्यूझीलंडच्या डॅनियल व्हेटोरीने त्याची प्रशंसा केली आहे. मलिकला ‘हिरा’ संबोधत व्हेटोरीने ब्रेट ली, शोएब अख्तर आणि शॉन टेटचा युग संपल्यानंतर त्याच्या रूपात एक दुर्लभ प्रतिभा पुढे आली असल्याचे सांगितले आहे.
इएसपीएन क्रिकइंफोवरील ‘टी२० टाइम आऊट’ या कार्यक्रमात बोलताना व्हेटोरी (Daniel Vettori) म्हणाला की, “त्याचा वेग फलंदाजांमध्ये भीती निर्माण करतो आणि असे केवळ खालच्या फळीतील फलंदाजांसोबत नव्हे तर, सर्वच फलंदाजाबाबत घडत आहे. आपल्याला नेहमी १५३-१५४ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज दिसत नाहीत. त्याचा वेग कमालीचा आहे. असे फारच दुर्मिळ पाहायला मिळते, जे आपण ब्रेट ली, शोएब अख्तर आणि शॉन टेटनंतर पाहिलेले नाहीय.”
पुढे व्हेटोरीने (Daniel Vettori On Umran Malik) मलिकमधील दुर्लभ प्रतिक्रियेला वाचवण्यासाठी त्याच्या कार्यभाराचे प्रबंधन करण्याचा सल्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) दिला आहे. व्हेटोरी म्हणाला की, “तो एक हिरा आहे. पुढील २ वर्षे भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्यातील प्रतिभेला जोपासले जाऊ शकते आणि त्याच्याकडून कसे सर्वश्रेष्ठ काढून घेता येईल, यावरही काम करावे लागेल. जर तो बीसीसीआय किंवा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या छत्रछायेत आला तर, ही त्याच्यासाठी सर्वश्रेष्ठ बाब ठरेल.”
“बीसीसीआय किंवा एनसीए त्याच्या कार्यभाराचे प्रबंधन करू शकते, कारण कोणत्याही गोलंदाजासाठी त्याच्या वेगासाठी गोलंदाजी करत राहाण्याचा मोह टिकून राहतो. मी शेन बॉन्डसोबत झालेल्या चर्चेनंतर असे वक्तव्य करत आहे. कारण त्याला असे वाटते की, गोलंदाज जितकी जास्त गोलंदाजी करतो, तितका त्याचा वेग कमी होत जातो. भारतीय क्रिकेटमध्ये अशा गोलंदाजांना नेट गोलंदाज म्हणून वापरले जाते. त्यांना परदेशी दौऱ्यांवर नेट गोलंदाज म्हणून नेले जाते. त्यामुळे त्यांच्यावरील कार्यभार थोडा जास्त होऊ शकतो,” असेही व्हेटोरीने म्हटले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियासोबत सनरायझर्सच्या ‘या’ पठ्ठ्याने गेले पाहिजे इंग्लंडला; गावसकरांनी मांडलंय मत
दोन वर्षांची मेहनत फळाला आली; शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत मॅच जिंकवणाऱ्या राशिदची प्रतिक्रिया