fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजस्थानच्या दिग्गज खेळाडूचे यंदाच्या हंगामात खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम

Not sure about availability of ben stokes says rajasthan royals coach andrew mcdonald tspo

September 16, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ rajasthanroyals

Photo Courtesy: Twitter/ rajasthanroyals


यावर्षी आयपीएलचा १३ वा हंगाम संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे खेळला जाणार आहे. अनेक दिग्गज खेळाडू या हंगामात खेळताना दिसणार नाहीत. मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल खेळण्यास नकार दिला. चेन्नई सुपर किंग्ज संघातील हरभजन सिंग आणि सुरेश रैना या दोन्ही खेळाडूंनी या हंगामातून माघार घेतली आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आणि सध्या राजस्थान रॉयल्स संघात असलेला बेन स्टोक्स आयपीएल खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. माजी क्रिकेटपटू आणि राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड ईएसपीएन क्रिकइन्फोशी याबद्दल बोलत होते.

ते म्हणाले, “त्याच्या वडिलांना मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. ऑगस्टमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेच्या दुसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी त्याने संघातून माघार घेतली होती. प्रथम आणि महत्त्वाचे म्हणजे आम्ही स्टोक्सच्या कुटुंबासोबत आहोत. ही एक कठीण परिस्थिती आहे, म्हणून आम्ही त्याला आवश्यक तेवढा वेळ देत आहोत. सध्या स्टोक्सची काय स्थिती आहे हे आम्हाला ठाऊक नाही, पण सर्व गोष्टी स्पष्ट झाल्यावर आम्ही निर्णय घेऊ शकतो.”

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड वनडे मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ खेळला नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती.

स्मिथबद्दल बोलतांना अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले, “मला वाटते की त्याची विचारसरणी स्पष्ट आहे. त्याला थोडा वेळ हवा आहे. दुखापत झाल्यानंतर पहिल्या आणि दुसर्‍या वनडे दरम्यान फारच कमी वेळ होता. आशा आहे की तो बुधवारी (तिसरा वनडे) मैदानावर दिसू शकेल.”

गेल्या वर्षी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या मॅकडोनाल्ड यांना आयपीएलमध्ये युवा खेळाडूंकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. ते म्हणाले, “आमच्याकडे उत्तम डावखुरे फलंदाज आहेत. विशेषत: अनुज रावत आणि यशस्वी जयस्वाल यांसारखे स्थानिक खेळाडू म्हणून आम्हाला काही चांगले पर्याय मिळाले आहेत. सोबतच डेव्हिड मिलरकडे चांगले कौशल्य आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

-मुंबईच्या भारतीय तिकडीतील ‘या’ खेळाडूला मिळाली दुखापतीतून प्रेरणा, म्हणतोय आता काही….

-मलिंगाच्या जागी सहभागी झालेला बुमराहचा संघसहकारी म्हणतोय, बुमराह म्हणजे…

-टी२० विश्वचषक तर आम्ही जिंकणारच, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटरने व्यक्त केला आत्मविश्वास

ट्रेंडिंग लेख-

-काय सांगता! एकाच सामन्यात टाकल्या गेल्या होत्या चक्क ७ चेंडूंच्या ३ ओव्हर

-भल्याभल्या गोलंदाजांना रडवणारा द्रविड ‘त्याची’ खेळी पाहून आला होता रडकुंडीला

-जेव्हा मुंबई इंडियन्सच्या ड्वेन ब्रावोसाठी अंबानींनी जमैकाला पाठवले थेट प्रायव्हेट जेट


Previous Post

मुख्याध्यापकांशी भांडून वडिलांनी त्याला खेळायला पाठवले आणि…

Next Post

युवा प्रतिभावान क्रिकेटर दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बोर्डाचे वाढले टेन्शन

Related Posts

Pune District Purandar Taluka Pisarve Gram Panchayat Election Result Mahesh Waghmare Winning Candidate Special Story
ब्लॉग

युवा क्रीडा पत्रकारानं उधळला विजयी गुलाल! तालुक्यात एकच चर्चा, दुप्पट वयाच्या उमेदवाराला चीतपट केलंय पोरानं

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Next Post

युवा प्रतिभावान क्रिकेटर दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बोर्डाचे वाढले टेन्शन

Photo Courtesy: Twitter/IPL

माजी दिग्गज म्हणतो, वॉटसन 'या' दोन गोलंदाजांविरुद्ध कसा खेळतो, पाहावे लागेल

Photo Courtesy: iNSTAGRAM/nezm

सर्व चौकटी मोडून जगात क्रिकेट समालोचनाचा आदर्श घालून देणारी नेरोली मिडोज

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.