पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघातील दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या दोन्ही संघातील पहिला सामना 26 डिसेंबर पासून माऊंट मौंगनुई येथे खेळला जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरा कसोटी सामना 2 जानेवारीला क्राइस्टचर्च येथे खेळला जाईल. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाचे गोलंदाजी कोच वकास युनीस उपलब्ध राहणार नाही.
वकार युनूसने आपल्या कुटुंबात सोबत पाकिस्तानमध्ये वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबतची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एका प्रेसनोटमार्फत दिली.
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यानंतर (पहिल्या कसोटी सामन्यानंतर) वकार युनूसने रजा मिळावी यासाठी अर्ज केला होता आणि त्याला रजा मंजूर झाली आहे. तो दक्षिण आफ्रिका संघासोबत पाकिस्तानमध्ये होणार्या क्रिकेट मालिकेपूर्वी पाकिस्तान संघासोबत पुन्हा जोडला जाईल. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना 26 जानेवारीला कराची येथे खेळला जाणार आहे.
पीसीबने वकार युनीसच्या रजेबद्दल दिली माहिती
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एका प्रेसनोटमार्फत सांगितले की, “वकार युनीसने टीम मॅनेजमेंटकडे रजा मागितली होती, कारण तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकेल. त्याचे कुटुंब सध्या लाहोर मध्ये आहे.”
पाकिस्तानचे मॅनेजर मंसूर राणाने वकार युनीसच्या रजेला पाठींबा दिला आहे. तो म्हणाला, “वकार युनूस इंग्लंड दौर्यापासून आपल्या कुटुंबासोबत राहिला नाही. वकार युनीस जून महिन्यापासून कुटुंबासोबत नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्ध मायदेशातील मालिका आणि न्यूझीलंड दौरा 14 फेब्रुवारीपर्यंत संपणार नाही. त्यामुळे आम्ही त्याला रजा देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे तो आपली पत्नी आणि मुलांसोबत काही वेळ घालवू शकेल.”
मंसूर राणा पुढे म्हणाला,” जर वकार युनीस न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी नंतर परतला तर मग त्याच्याकडे फक्त एक आठवड्याचा वेळ राहील. आमच्यासाठी सर्वात पहिले कुटुंब येते आणि यापूर्वी ही असे निर्णय आम्ही घेतले आहेत.”
पाकिस्तान संघाने गमावली टी-20 मालिका
पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावले होते. मात्र शेवटचा टी-20 सामना पाकिस्तान संघाने 4 विकेटने जिंकला. पण, या मालिकेत पाकिस्तानचा 2-1 अशा फरकाने पराभव झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
भन्नाटच! न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूने घेतला अचंबित करणारा एकहाती झेल; व्हिडिओ व्हायरल
जामीनानंतर रैनाने दिले अटकेबाबत स्पष्टीकरण; सांगितली संपूर्ण घटना
बाबो!! चक्क मैदानावर प्रतिस्पर्ध्याच्या तोंडावर थुंकला ‘हा’ खेळाडू, झाली मोठी कारवाई; पाहा व्हिडिओ