चार वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलेला संघ चेन्नई सुपर किंग्सने ओडिशाचा (Odisha Cricket Team) फलंदाज सुभ्रांशू सेनापतीला (Subhranshu Senapati) निवड चाचणीसाठी बोलावले. सुभ्रांशू सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, त्याने सात सामन्यात २७५ धावा केल्या आहेत. हा उजव्या हाताचा फलंदाज ओडिशासाठी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
८ डिसेंबरला त्याने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आंध्र प्रदेश विरुद्ध शतक झळकावले होते. त्याच्या शतकामुळे संघाची धावसंख्या २७८-५ अशी झालेली. ओडिशाने तो सामना ६३ धावांनी जिंकला. त्याने विदर्भ आणि हिमाचल प्रदेश विरुद्ध अर्धशतक केले होते. ओडिशा संघ ५ सामन्यात ३ विजय मिळवून एलिट गट अ मध्ये चौथ्या स्थानावर होता आणि त्यामुळेच पुढच्या फेरीत नाही जाऊ शकला.
Subhranshu Senapati Called for Selection Trials by the champions CSK in the IPL. Bringing you his batting highlights from the recently concluded Vijay Hazare Trophy & Syed Mushtaq Ali Trophy. @BCCI @ChennaiIPL @cricket_odisha @WasimJaffer14 pic.twitter.com/gBKlFDaDX4
— Odisha Cricket Association (@cricket_odisha) December 18, 2021
सेनापतीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) सुद्धा चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्याने पाच सामन्यात २७.६० च्या सरासरीने ११६.९४ च्या स्ट्राईक रेटने १३८ धावा केलेल्या. ज्यात एका अर्धशतकाचा समावेश होता. त्याने २०१७ मध्ये पदार्पण केल्यापासून २६ टी-२० सामन्यांमध्ये २८.९५ च्या सरासरीने ६३७ धावा केल्या त्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
सीएसकेने (CSK) आयपील मेगा लिलाव २०२२ च्या पहिले ४ खेळाडूंना रिटेन केलं. रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) सर्वात जास्त किंमत म्हणजेच १६ कोटी, तसेच कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) १२ कोटी, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला (Moeen Ali) ८ कोटी तर सलामीवीर ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) ६ कोटी रुपयांत रिटेन केले आहे.
चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) हरवत आपल्या चौथ्या आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले होते. आयपीएल २०२० (IPL 2020) हंगाम संघासाठी खास नव्हता गेला. कारण, संघ आयपीलच्या इतिहासात पहिल्यांदा प्लेऑफससाठी क्वालिफाय झाला नव्हता.
आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये चेन्नई ०.४५५ च्या रन रेटने १४ मधले ९ सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम राहिली. त्यामुळे क्वालिफायर १ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. तिथे धोनी फिनिशर म्हणून जुन्या अंदाजात दिसला. अंतिम सामन्यात केकेआरला (KKR) मोठ्या फरकाने हरवून त्यांनी विजेतेपद पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रीय ज्युनियर रोईंग अजिंक्यपद स्पर्धा: बॉईज स्पोर्टसने राखले वर्चस्व, महिला गटात केरळ संघ प्रथम
पाकिस्तानी दिग्गजाने निवडली ‘टी२० टीम ऑफ द इयर’; चौघा भारतीयांचा समावेश