ऑलिम्पिक चॅम्पियन आणि विणकाम … हे समीकरण थोडं विचित्र वाटेल. परंतु टोकियो ऑलिम्पिकमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील एक सुवर्णपदक विजेता खेळाडू स्टेडियममध्ये बसून विणकाम करत होता. हे पाहून जगभरातील चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. हा विणकाम करणारा दुसरा तिसरा कोणी नसून ब्रिटनचा ऑलिम्पिक चॅम्पियन डायव्हर टॉम डेली आहे. जो खेळात प्रभुत्व मिळवलेला खेळाडू आहे. तसेच त्याच्याकडे विणकाम करण्याची कला देखील आहे आणि त्याची कला टोकियो ऑलिम्पिकमध्येही दिसून आली आहे.
टॉमने पुरुषांच्या १० मीटर सिंक्रोनाइज्ड प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये मॅटी लीसह सुवर्णपदक जिंकले आहे. यानंतर तो महिलांच्या ३ मीटर स्प्रिंगबोर्ड अंतिम सामन्यात प्रेक्षकांमध्ये बसून स्वेटर विणताना दिसून आला आहे. २७ वर्षीय टॉम त्याच्या यूके टीमची जर्सी परिधान करून स्टँडमध्ये बसला होता. यावेळी सामना पाहता पाहता तो स्वेटर विणण्याचे काम करताना दिसत आहे.
तिसऱ्या फेरीच्या डाइव्हला सुरुवात होण्यापूर्वी कॅमेरामनने त्याच्याकडे कॅमेरा फिरवला आणि सर्वांचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले. सुवर्णपदक विजेत्या टॉमला विणकाम करताना सर्वांच्या भुवया उंचावल्या.
Oh this? Just Olympic champ @TomDaley1994 knitting in the stands while watching the diving. 🧶 pic.twitter.com/o17i6vsG2j
— The Olympic Games (@Olympics) August 1, 2021
Tom Daley is knitting at the 3m women final #Tokyo2020 pic.twitter.com/cyR5rGRRxE
— Dal Bologknees 🍝 (@DalBologknees) August 1, 2021
महत्वाची गोष्ट अशी की, या सामन्यादरम्यान कोणतेही ब्रिटिश डायव्हर्स तेथे उपलब्ध नव्हते. या खेळाडूने आपले सुवर्णपदक ठेवण्यासाठी स्वत: कव्हरही विणले आहे. तीन वेळच्या विश्वविजेता टॉमने २०१२ लंडन आणि २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदके जिंकली आहेत.
What did @TeamGB's @TomDaley1994 do after winning an Olympic gold medal?
He knitted a little pouch for it 😍#TokyoOlympics (via IG/madewithlovebytomdaley) pic.twitter.com/SCg3lV3KIk
— NBC Olympics & Paralympics (@NBCOlympics) July 29, 2021
टॉमने डिसेंबर २०१३ मध्ये एक यूट्यूब व्हिडिओ रिलीज केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले होते की, तो एका पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. टॉमने ऑक्टोबर २०१५ मध्ये अमेरिकन ऑस्कर विजेता चित्रपट पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता डस्टिन लान्स ब्लॅकसोबत साखरपुडा केला आहे आणि २०१७ मध्ये त्यांनी लग्न केले आहे. त्याचबरोबर २०१८ मध्ये त्याने जाहीर केले होते की, तो आणि त्याचा साथीदार पहिल्या अपत्याबद्दल विचार करत आहेत. नंतर जूनमध्ये या जोडप्याने मुलाला जन्म दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सिव्हर मेडल’ विजेत्या मिराबाई चानूचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर! अभिनेत्रीचा शोध सुरू
भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियावर १-० ने मात करत उपांत्य फेरीत मारली धडक