---Advertisement---

किंग कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वर्षे पूर्ण! पाहा ‘विराट’ कामगिरी

On: रविवार, ऑगस्ट 18, 2024 8:26 AM
---Advertisement---

विराट कोहलीने 16 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (18 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. किंग कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 वर्षे पूर्ण केली. कोहलीने श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एकदिवसीय सामन्यांद्वारे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. करिअरच्या सुरुवातीपासूनच किंग कोहलीने आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्याला क्रिकेटचा ‘किंग’ अशी व्यख्या मिळाली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर, त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विराट कोहलीने टीम इंडियामध्ये स्वत:ला स्थापित केले. आणि आपले स्थान पक्के केले. त्यानंतर हळूहळू त्याच्याकडे कर्णधार म्हणून पाहिले जाऊ लागले. त्यानंतर एमएस धोनीनंतर कोहलीला तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नवी उंची गाठली. यात तिळमात्र शंका नाही.

वनडेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या किंग कोहलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये हळूहळू संघात स्थान निर्माण केले. 2010 मध्ये, त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर 2011 मध्ये किंग कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश केला. तिन्ही फॉरमॅटच्या संघात स्थान मिळवल्यानंतर कोहलीची गाडी स्पीड पकडली.

टीम इंडियाने टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावताच विराट कोहलीने टी-20 इंटरनॅशनलला अलविदा केला होता. आता तरुणांना संधी देण्याची वेळ आली आहे असे म्हणत त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 113 कसोटी, 295 एकदिवसीय आणि 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 191 डावांमध्ये त्याने 49.15 च्या सरासरीने 8848 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 29 शतके आणि 30 अर्धशतके केली आहेत. तसेच त्याची सर्वोच्च धावसंख्या 254* धावा आहे.

याशिवाय, वनडेच्या 283 डावांमध्ये त्याने 58.18 च्या सरासरीने 13906 धावा केल्या आहेत, ज्यात 50 शतके आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील उर्वरित 117 डावांमध्ये किंग कोहलीने 48.69 च्या सरासरीने आणि 137.04 च्या स्ट्राइक रेटने 4188 धावा केल्या, ज्यामध्ये 1 शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा-

आली लहर केला कहर! आयुष बदोनीचा रिषभ पंतच्या संघाला दे धक्का
बॉर्डर-गावसकर मालिकेत बुमराहसोबत नवा गडी टीम इंडियात उतरणार? जय शाह स्पष्टच म्हणाले…
भुवनेश्वर कुमारने पत्नीचा वाढदिवस बनवला खास, दिले शानदार सरप्राईज; होतंय कौतुक!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---