क्रिकेटमधील ‘कंजूस गोलंदाज’ म्हणून ज्यांना ओळखले जाते ते म्हणजे बापू नाडकर्णी. ४ एप्रिल १९३३ ला नाशिक येथे जन्मलेले नाडकर्णी यांनी भारताकडून ४१ कसोटी सामने खेळले आहेत. नाडकर्णी यांनी १९५५ ला न्यूझीलंड विरूद्ध दिल्लीमध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले होते. तर त्यांनी शेवटचा कसोटी सामना ऑकलॅडमध्ये न्यूझीलंडविरूद्धच १९६८ मध्ये खेळला होता.
तब्बल २१ षटके निर्धाव…
विशेष म्हणजे ५८ वर्षांपूर्वी म्हणजेच १२ जानेवारी १९६४ ला नाडकर्णी यांनी इंग्लंड विरूद्ध मद्रास (आताचे चेन्नई) येथे कसोटीमध्ये सलग २१ षटके निर्धाव षटक टाकले होते. त्यावेळेस त्यांनी एकूण ३२ षटकांमध्ये २७ षटके निर्धाव टाकत फक्त ५ धावा दिल्या होत्या. यातील सलग २१ षटके निर्धाव होती. सर्वाधिक सलग निर्धाव षटके टाकण्याचा विक्रमही अजून त्यांच्याच नावावर आहे.
#OnThisDay in 1964, Bapu Nadkarni bowled a record-breaking 21 consecutive maidens! 🤯
Going at just 0.16 runs an over, the late Indian great conceded just 27 runs throughout his two-hour spell. pic.twitter.com/hrQIABXP8m
— ICC (@ICC) January 12, 2021
नाणे ठेवून करायचे सराव
नाडकर्णी नेहमीच गोलंदाजी करताना कमीत कमी धावा देण्यासाठी ओळखले जात होते.
ते सराव करताना नाणे ठेवून गोलंदाजी करायचे. डावकरी गोलंदाज असलेले नाडकर्णी केवळ गोलंदाजीच नाही तर फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही उत्तम होते. त्यांनी इंग्लंडविरुद्ध १९६३-८४ ला झालेल्या कसोटी मालिकेत १२२ धावांची खेळी देखील केली होती.
त्यांच्याबद्दल भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी एकदा म्हटले होते की ‘बापू अनेक दौऱ्यात सहाय्यक व्यवस्थापक म्हणून संघाबरोबर होते. ते खेळाडूंना प्रेरणा देण्यामध्ये नेहमी पुढे असायचे.’
One of the most economical bowlers in the history of the game, Bapu Nadkarni was born #OnThisDay in 1933.
In a career spanning 41 Tests, he picked up 88 wickets with an economy rate of just 1.67, and he also scored 1,414 runs. pic.twitter.com/ITi0bjHD9n
— ICC (@ICC) April 4, 2020
त्यांनी भारतासाठी ४१ कसोटी सामने खेळताना १४१४ धावा केल्या आहेत. तर ८८ विकेट देखील घेतल्या आहेत. त्यांनी मुंबईसाठी १९१ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ५०० विकेट्स घेतल्या आहेत. तर ८८८० धावा देखील केल्या आहेत.
नाडकर्णी यांचे १७ जानेवारी २०२० ला वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल अपडेट | आरसीबीच्या ताफ्यात नव्या शिलेदाराची एन्ट्री, टी२०त खोऱ्याने ओढतो धावा
चेन्नईची IPL इतिहासातील खराब सुरूवात, सलग तिसरा सामना गमावला; पंजाब ५४ धावांनी विजयी
पंजाबच्या नव्या शिलेदाराने पदार्पणातच मैदान मारलं, चेन्नईच्या २ तगड्या फलंदाजांना बाद केलं