fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रत्येक आयपीएल संघातील एक असा खेळाडू, ज्याची कामगिरी ठरवेल त्याच्या संघाचे भविष्य

one player all teams poor form team

September 17, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


क्रिकेटमधील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-२० क्रिकेट मधील स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा सत्र सुरू काही दिवसांत सुरु होणार आहे. आयपीएलच्या या हंगामासाठी सर्व संघ पूर्णपणे तयारीत आहेत. सर्व संघानी जोरात तयारी केली आहे. या सर्व संघाचा यंदाचा आयपीएल चषक मिळवण्याचा नक्की प्रयत्न असेल.

सर्व संघ पूर्णपणे संतुलित आहेत, आठ संघांमध्ये असे काही खेळाडू आहेत जे संघाला एकहाती विजय मिळवून देऊ शकतात. सर्व संघ काही खेळाडूंवर अवलंबून असतात. नेहमी त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते.

या लेखातही प्रत्येक आयपीएल संघातील अशा एका खेळाडूबद्दल जाणून घेऊ जे त्यांच्या संघासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील.

चेन्नई सुपर किंग्ज – एमएस धोनी

चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएलमध्ये प्रत्येक हंगामात जबरदस्त कामगिरी करतो. या संघाने खेळलेल्या प्रत्येक हंगामात पहिल्या ४ मध्ये स्थान मिळवले आहे. यंदा चेन्नई सुपर किंग्ज संघ खूप अनुभवी आणि संतुलित दिसत आहे. या मोसमात सुरेश रैना नसल्याने संघाला निश्चितच फरक पडेल. परंतु संघात एमएस धोनी सारखा कर्णधार आणि फलंदाज असल्याने संघाला सामने जिंकणे कठीण जाणार नाही.

रैनाच्या अनुपस्थितीमुळे एमएस धोनी यावेळी संघाचा मुख्य फलंदाज असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आपली फलंदाजीची ताकद दाखविण्यास धोनी उत्सुक आहे, परंतु या हंगामात धोनी फलंदाजीमध्ये फ्लॉप झाला तर त्याच्या संघाला बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. धोनीच्या खराब कामगिरीचा फटका संघाला बसू शकतो.

दिल्ली कॅपिटल – रीषभ पंत

दिल्ली कॅपिटल संघालाही यंदा प्रथम विजेतेपद मिळवायचे आहे. दिल्ली कॅपिटलमध्ये एकापेक्षा एक महान खेळाडू आहेत, जे एकहाती सामना जिंकून देऊ शकतात. संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा प्रचंड संतुलन आहे. या संघात यष्टीरक्षक फलंदाज रीषभ पंत हे संघाचे सर्वात मोठे शस्त्र आहे.

रीषभ पंत हा गेल्या दोन हंगामात उत्तम प्रदर्शन करत आहे. जर रीषभ पंतने आपली कामगिरी उत्तम पार पडली तर संघाला यंदाचा चषक निश्चित असेल. परंतु जर या हंगामात रीषभ पंत फलंदाजीत अपयशी ठरला तर संघाचे खूप नुकसानही होऊ शकते. त्याचा खराब कामगिरीचा थेट परिणाम संघावर होईल.

किंग्ज इलेव्हन पंजाब – केएल राहुल

भारताचा प्रतिभावान फलंदाज केएल राहुल यंदा किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. किंग्स इलेव्हन पंजाबला या हंगामात केएल राहुलकडून बरीच अपेक्षा आहेत. त्याला फलंदाजी बरोबरच कर्णधाराच्या भूमिकेतूनही स्वतःची छाप पडायची आहे.
या हंगामात राहुलने संघाला आयपीएलचे पहिले विजेतेपद मिळवून द्यावे अशी किंग्ज इलेव्हनची इच्छा आहे.

गेल्या दोन मोसमात केएल राहुलने चांगली कामगिरी केली आहे. परंतु आता जर ते या मोसमात फ्लॉप झाल्या तर त्यांचा संघ त्यांच्यासह अपयशी ठरू शकेल. कर्णधाराची जबादारी निभावताना त्याला फलंदाजीतही सातत्य राखणे आवश्यक आहे.

कोलकाता नाइट रायडर्स – आंद्रे रसेल

कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगमध्ये दोन वेळा विजेतेपद जिंकले आहे. २०१४ नंतर तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. पण आतापर्यंत त्यांना यश मिळाले नाही. तसे, केकेआरच्या संघामध्ये जेतेपद जिंकण्याची पूर्ण क्षमता आहे.
या संघात सामने जिंकून देणारे काही खेळाडू आहेत. त्या खेळाडूंपैकी सर्वात मोठे नाव आंद्रे रसेल असे मानले जाते. आंद्रे रसेल हा संघाचा एक प्रकारचा हुकमी इक्का आहे. सध्या तो फॉर्मात आहे, परंतु जर या हंगामात आंद्रे रसेल अपयशी ठरला तर संघावर परिणाम होईल.

मुंबई इंडियन्स – जसप्रीत बुमराह

चार वेळा चॅम्पियन झालेला मुंबई इंडियन्स संघ देखील यंदा आयपीएल विजेतेपदाचा प्रमुख दावेदार आहे. मुंबई इंडियन्स संघाला विजेतेपदासाठी सर्वाधिक पसंती दिली जाते. हा एक संतुलित संघ आहे. या संघात जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी आहे. वेगवान गोलंदाज हे संघातील सर्वात मोठे शस्त्र आहे.

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत बरीच प्रभावी कामगिरी केली आहे. संघाच्या यशात त्यांचे मोठे योगदान आहे. बुमराहच्या फॉर्मचा संघावरही चांगला परिणाम झाला आहे. परंतु जर बुमराह या वेळी खराब फॉर्ममध्ये असेल तर त्याचा संपूर्ण संघाच्या कामगिरीवर परिणाम स्पष्टपणे दिसून येईल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ या हंगामात विजेतेपद मिळवण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. यावेळी आरसीबी संघाचे लक्ष चषकावर लागले आहे. संघात दिग्गज खेळाडू आहेत ज्यांच्यात या वेळी चॅम्पियन बनविण्यात मोठे योगदान देण्याची क्षमता आहे.

पण आरसीबीच्या संघाचे यश विराट कोहलीच्या रुपात दडलेले आहे. कर्णधार विराट कोहली जर फॉर्ममध्ये आला आरसीबीचा मार्ग सुकर होईल, परंतु जर विराट कोहलीचा फॉर्म चांगला नसेल तर आरसीबी अडचणीत येईल, कारण त्याच्या खराब फॉर्मचा सर्व परिणाम संघावर होईल.

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर

आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्स संघाला चॅम्पियन होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर या संघाचे कधीही विजेतेपद मिळवले नाही. या हंगामात राजस्थान रॉयल्स संघ दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याच्या हेतूने स्पर्धेत उतरेल. संघ या हंगामात एक उत्कृष्ट कामगिरी करू शकतो, कारण त्यांच्याकडे असे काही खेळाडू आहेत जे संघाला जेतेपद मिळविण्यात मदत करू शकतात.

जोस बटलर हा संघातील सर्वात मोठा खेळाडू आहे. गेल्या दोन हंगामात जोस बटलर प्रभावी ठरला होता. संघाच्या फलंदाजीची जबाबदारी त्याच्यावर असेल. जोस बटलर स्वतःचा सिद्ध करण्यास तयार आहे परंतु तो यात या अपयशी झाला तर त्याचा संघावरही नकारात्मक परिणाम होईल.

सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघ एक अतिशय संतुलित संघ मानला जात आहे. या संघात गोलंदाजी आणि फलंदाजीद्वारे प्रभावीपणे कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये चांगले संतुलन आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाबद्दल बोलताना त्यांचे यश कर्णधार डेव्हिड वॉर्नरवर अवलंबून आहे.

डेव्हिड वॉर्नर आयपीएलमधील एक धोकादायक फलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे. तो प्रत्येक हंगामात फलंदाजीत यशस्वी ठरला आहे. डेव्हिड वॉर्नरने जबरदस्त कामगिरी केल्याने संघाला फायदा नक्की होतो. परंतु जर तो यंदा अपयशी ठरला तर त्याचा परिणाम संपूर्ण संघावर होईल. ज्यामुळे संघाची कामगिरी विशेष होणार नाही.


Previous Post

माजी दिग्गज म्हणतो, ‘संघांना मांकडिंगपासून रोखायचे असेल, तर ‘हे’ काम करा’

Next Post

क्रिकेटच्या लोकप्रिय होस्टसोबत दिसणार टीम इंडियाचा ‘हा’ माजी खेळाडू…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय संघांमध्येच रंगणार सामने

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडिया थँक्यू! ‘हा’ फोटो शेअर करत नॅथन लायनने मानले आभार

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ BCCI
क्रिकेट

सौरव गांगुलीच्या झाल्या अनेक चाचण्या; हॉस्पिटलने दिले प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

आर अश्विन, रिषभ पंतसह पाच भारतीय खेळाडू ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी शर्यतीत

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

कचरा वेचणारा मुलगा ते ‘युनिव्हर्स बॉस’

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ BCCI

क्रिकेटच्या लोकप्रिय होस्टसोबत दिसणार टीम इंडियाचा 'हा' माजी खेळाडू...

Photo Courtesy: Facebook/IPL

श्रेयस अय्यरने आपल्या संघातील 'या' २ दिग्गजांना सांगितले 'मेंदू', घ्या जाणून...

Photo Courtesy: Twitter/ mipaltan

मुंबई- चेन्नई सामन्यात येणार मज्जा! कारणही आहे तसेच खास

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.