---Advertisement---

कारकिर्दीत केवळ चौथ्यांदा विराटने घेतला ‘हा’ निर्णय

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 4:56 PM
virat-kohli
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना बुधवारपासून (२५ ऑगस्ट) हेडिंग्ले मैदानावर सुरू झाला आहे. या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारतीय फलंदाज विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी, सामन्यादरम्यान विराटने घेतलेला एक निर्णय त्याने कारकिर्दीत केवळ चौथ्यांदा घेतला आहे.

भारतीय संघात झाला नाही बदल
लॉर्ड्स कसोटी जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहलीने संघात कोणताही बदल केला नाही. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचा या सामन्यासाठी संघात समावेश होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, त्याला पुन्हा एकदा बाकावर बसावे लागले. भारतीय संघाने या सामन्यांमध्ये चार वेगवान गोलंदाजांसह अष्टपैलू रवींद्र जडेजा फिरकीपटू म्हणून संधी दिली.

केवळ चौथ्यावेळी घेतला असा निर्णय
भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यासाठी संघात एकही बदल केला नाही. आपल्या नेतृत्वात त्याने केवळ चौथ्यांदा असा निर्णय घेतला. त्याने सर्वप्रथम २०१८ इंग्लंड दौऱ्यावेळी ट्रेंट ब्रिज व साऊथम्पटन कसोटीत एकसारखा संघ खेळवलेला.

सन २०१९ वेस्ट इंडीज दौऱ्यावर नॉर्थ साऊंड व किंग्स्टन कसोटीत त्याने एकच संघ उतरवलेला. अखेरच्या वेळी त्याने २०१९ मध्ये बांगलादेश संघ भारत दौऱ्यावर आला असताना इंदोर व कोलकाता कसोटीत एकसारखा संघ खेळविलेला. विराट लीड्समध्ये ६४ व्या कसोटीत भारताचे नेतृत्व करत आहे.

भारताची खराब सुरुवात
विराट कोहलीने घेतलेला फलंदाजीचा निर्णय भारतीय संघासाठी लाभदायी ठरला नाही. लॉर्ड्स कसोटीतील शतकवीर केएल राहुल पहिल्याच षटकात तंबूत परतला. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर उतरलेला चेतेश्वर पुजारा हा देखील केवळ एक धाव काढू शकला. कर्णधार विराट कोहली देखील ७ धावांवर झेलबाद झाला. या तिघांना जेम्स अँडरसनने तंबूचा रस्ता दाखवला.

महत्त्वाच्या बातम्या-

https://mahasports.in/engvsind-3rd-test-1st-day-live-james-anderso-takes-kl-rahul-and-cheteshwar-pujara-wicket/

खळबळजनक खुलासा! लॉर्ड्सच्या लॉन्ग रूममध्ये भिडले होते कोहली अन् रूट, कारणही होते मोठे

भारतीय क्रिकेटर मंधाना आहे कसोटी क्रिकेटची चाहती, पाहायला आवडते कोहली-अँडरसनमधील वैर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---