दक्षिण आफ्रिकेच्या टी20 लीग (एसए 20) काही फ्रॅंचायजींसाठी प्रशिक्षकांची नियुक्ती झाली आहे. या लीगमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) राजस्थान रॉयल्सचा मालकी हक्क असणारा संघदेखील आहे. पार्ल रॉयल्स असे या संघाचे नाव आहे. या संघासाठी गुरूवारी (15 सप्टेंबर) प्रशिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा जानेवारी 2023मध्ये खेळी जाणार आहे.
पार्ल रॉयल्सच्या (Paarl Royals) प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जेपी डुमिनी (JP Duminy) याची नेमणूक केली आहे. तो मध्यल्या फळीत विस्फोटक आणि प्रभावशाली फलंदाजी तसेच ऑफ स्पिनसाठी ओळखला जातो. मुख्य प्रशिक्षक डुमिनीसोबत सपोर्ट स्टाफमध्ये रिचर्ड दास नेव्स हे पण आहेत. नेव्स हे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाचा भाग राहिले आहेत. ते पार्ल संघासाठी रणनीति आणि फिरकीपटू गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
माजी टायटन्स आणि नॉर्दर्नचे वेगवान गोलंदाज मंडला माशिम्बी हे पार्लच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तसेच मार्क चार्लटन हे दक्षिण आफ्रिकेमधील लेव्हल 4 चे उत्तम प्रशिक्षकांपैकी एक आहेत. त्यांना नुकतेच दक्षिण आफ्रिकेच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘डिवीजन 2 कोच ऑफ द सीजन अवॉर्ड’ दिला होता. ते पार्ल संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून रुजू होणार आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू लिसा केइटली टेक्टिकल परफॉर्मेंस प्रशिक्षक म्हणून संघाशी जोडली जाणार आहे.
The team behind the team for our first ever #SA20 campaign. 🙌💗#RoyalsFamily pic.twitter.com/L25o4ZqUbT
— Paarl Royals (@paarlroyals) September 15, 2022
पार्ल संघाचे घरचे मैदान बोलॅण्ड क्रिकेट ग्राउंड असणार आहे. संघाचे कॅटालिस्ट म्हणून रसेल एस्पेलिंग यांना नियुक्त केले आहे. एस्पेलिंग यांनी पार्ल रॉक्समध्ये डुमिनीसोबत काम केले होते. तर राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट निदेशक कुमार संगकारा आणि जुबिन भरूचा हे पण पार्लच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहेत. तर एटी राजमणि प्रभु स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग प्रशिक्षक यांच्या भुमिकेत असणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एलिसा पेरीने तोडला विश्वविक्रम, ‘इतके’ किमी पळत येत डेविड वॉर्नरला केली बॉलिंग
टी20 विश्वचषकात येणार नाही मजा! सात-सात वर्ल्डकप खेळलेले वेस्ट इंडिजचे दिग्गजच बाहेर
VIDEO | टी20 विश्वचषकासाठी बूम बूम बुमराह सज्ज, तास-न्-तास करतोय सराव