रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात 317 धावांनी विश्वविक्रमी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने नाबाद 166 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर क्रिकेटविश्वातून त्याचे कौतुक होताना दिसत आहे. पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल याने खास ट्विट करत त्याचे अभिनंदन केले.
तिरुअनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने दीडशतक ठोकले. विराटने यादरम्यान 110 चेंडूत 8 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने नाबाद 166 धावांचा पाऊस पाडला. हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील 46 वे तर, एकूण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 74 वे शतक ठरले. त्याच्या या खेळीनंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याचे कौतुक केले.
पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल याने ट्विट करत लिहिले,
‘रन मशीन द किंग विराट कोहली. 46 वे वनडे शतक. सध्याच्या क्रिकेट युगाचा बॉस.’
Runs machine The KING @imVkohli …46th ODI century..He is the boss of this era 👏🏻👏🏻
— Kamran Akmal (@KamiAkmal23) January 15, 2023
याव्यतिरिक्त माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ, झूलन गोस्वामी, वसीम जाफर यासारख्या अनेक क्रिकेटपटूंनी त्याचे अभिनंदन केले.
तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 391 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 22 षटकात 73 धावांवर संपुष्टात आला. भारतासाठी मोहम्मद सिराज याने भेदक गोलंदाजी करत 4 महत्वपूर्ण बळी मिळवले. त्याआधी विराट कोहली व शुबमन गिल यांनी शतके झळकावत भारताला 391 धावांपर्यंत पोहोचवले होते. यासह भारताने मालिकाही नावावर करत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला.
(Pakistan Cricketer Kamran Akmal Congratulations Virat Kohli For His 46 ODI Century)
महत्वाच्या बातम्या-
एकदमच टॉपला! सध्या खेळत असलेल्या खेळाडूंत कोणीही नाही विराटच्या आसपास; पाहा ही आकडेवारी
INDvSL: शुबमन गिलच्या शतकाआधी युवराज सिंगने म्हटले, ‘क्रिकेट मरतय का?’; जाणून घ्या कारण