---Advertisement---

पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली या भारतीय मुलीबरोबर अडकला लग्नबंधनात

On: बुधवार, ऑगस्ट 21, 2019 1:56 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने काल(20 ऑगस्ट) शामिया आरजू या भारतीय मुलीशी दुबईत निकाह केला आहे. त्यामुळे भारतीय मुलीशी लग्न करणारा अली हा चौथा पाकिस्तानी क्रिकेटपटू ठरला आहे.

याआधी झहिर अब्बास, मोहसीन खान आणि शोएब मलिकने भारतीय मुलीशी लग्न केले आहे. मलिकने 2010मध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केले आहे.

हसन अली आणि शामिया अरजू यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच हसन अलीनेही त्याच्या मेहंदी सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/B1YaX17ndJx/?igshid=1rbh6tmoxcu3r

https://twitter.com/RealHa55an/status/1163750712096034817

तसेच त्याने निकाहच्या आदल्यादिवशी ‘बॅचलर म्हणून शेवटची रात्र’ असे कॅप्शन देऊन एक फोटो शेअर केला होता.

https://twitter.com/RealHa55an/status/1163539779507707904

अलीने त्याच्या लग्नासाठी भारतीय तसेच पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आमंत्रणही दिले होते. पण पाकिस्तानमधील शादाब खान हा एकमेक क्रिकेटपटू लग्नासाठी उपस्थित होता.

अलीची पत्नी शामिया ही हरियाणा राज्यातील मेवत जिल्ह्यात राहते. तसेच ती एरोनॉटिकल इंजिनियर असून एमिरेट्स एअरलाईनमध्ये कामाला आहे. त्यामुळे सध्या ती दुबईत स्थायिक झाली आहे. तर तीचे कुटुंब भारतात आहे.

https://twitter.com/Saj_PakPassion/status/1163504549367296001

https://twitter.com/Saj_PakPassion/status/1163866426102419457

https://twitter.com/MediaChowk/status/1163887781539655680

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या जर्सीच्या कॉलरवर आहे हे सोनेरी फुल, जाणून घ्या कारण

श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत विलियम्सन नाही तर हा खेळाडू करणार न्यूझीलंडचे नेतृत्व

तिसऱ्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ, हा अनुभवी खेळाडू सामन्यातून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment