आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तान संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. मंगळवारी (२ नोव्हेंबर) नामिबिया संघाला पराभूत करत पाकिस्तान संघाने सलग चौथा विजय नोंदवला आणि आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
पाकिस्तान संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत आतापर्यंत एकूण ४ सामने खेळले आहेत. या चारही सामन्यात पाकिस्तान संघाने जोरदार विजय मिळवला. ग्रूप १ मधून इंग्लंड संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर ग्रूप २ मधून उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पाकिस्तान पहिलाच संघ ठरला आहे.
या अप्रतिम कामगिरीसह पाकिस्तान संघाने पाचव्यांदा आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेचे आतापर्यंत ६ हंगाम झाले आहेत. तर ७ वा हंगाम यूएई आणि ओमानमध्ये सुरू आहे. स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात पाकिस्तान संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु त्यांना भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या हंगामात पाकिस्तान संघाने जेतेपद मिळवले होते. तर २०१० आणि २०१२ मध्ये झालेल्या स्पर्धेत पाकिस्तान संघाला उपांत्यफेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी मात्र पाकिस्तान संघ चांगल्याच फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे पाकिस्तान संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
तसेच नामिबिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने २० षटक अखेर २ बाद १८९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नामिबिया संघाला २० षटक अखेर ५ बाद १४४ धावा करण्यात यश आले. हा सामना पाकिस्तान संघाने ४५ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
कधी, कुठे आणि कसा पाहाल टी२० विश्वचषकातील भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना? जाणून घ्या एका क्लिकवर
टी२० विश्वचषक: नामिबियाला नमवत पाकिस्तानने ९ वर्षांनी मारली उपांत्य फेरीत धडक