---Advertisement---

सामना जिंकला पाकिस्ताननं, अन् सेलिब्रेशन ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचं; एकदा पाहाच हा भन्नाट व्हिडिओ

On: सोमवार, जुलै 19, 2021 6:59 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याला मनोरंजनाचे पॉवर हाऊस म्हटले जाते. मैदानात असो किंवा मैदानाच्या बाहेर तो नेहमीच आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसून आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेत गेलने तुफान फटकेबाजी करत टी -२० क्रिकेटमध्ये १४,००० धावा पूर्ण करण्याचा कारनामा केला आहे. ही मालिका संपल्यानंतर ख्रिस गेल इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी -२० सामन्यांचा थरार अनुभवताना दिसून आला आहे.

नॉटिंगहॅममध्ये इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पार पडलेल्या पहिल्या टी -२० सामन्यात पाकिस्तान संघाने ३१ धावांनी विजय मिळवला होता. हा सामना पाहण्यासाठी ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलने देखील हजेरी लावली होती. या सामन्यात ख्रिस गेल पाकिस्तान संघाला चियर करताना दिसून आला होता. हा सामना झाल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल,पाकिस्तानची जर्सी घालून पाकिस्तान संघाला चियर करत आहे. स्टेडियमच्या बाहेर ख्रिस गेल सोबत डान्स करण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

पाकिस्तान संघाने उभारला २३२ धावांचा डोंगर
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाकडून बाबर आजमने ४९ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ८५ धावांची खेळी केली होती. मोहम्मद रिजवानने ४१ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ६३ धावांची केली होती. २० षटक अखेर पाकिस्तान संघाला ६ गडी बाद २३२ धावा करण्यात यश आले होते. या पाकिस्तानच्या टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम धावा आहेत.

लिविंगस्टोनची एकहाती झुंज अपयशी 
पाकिस्तान संघाने दिलेल्या २३३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाकडून लियाम लिविंगस्टोनने एकहाती झुंज देत अवघ्या ४३ चेंडुंमध्ये ६ चौकार आणि ९ षटकारांच्या साहाय्याने १०३ धावांची खेळी केली होती. परंतु, त्याला इतर कुठल्याही फलंदाजाची साथ मिळाली नव्हती. त्यामुळे या सामन्यात इंग्लंड संघाचा ३१ धावांनी पराभव झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय संघाचे कौतुक करण्याचा वसीम जाफरचा हटके अंदाज, मीमला दिले भन्नाट कॅप्शन

श्रीलंकाच काय, तर भारताचा ब संघ इंग्लंडलाही हरवेल; ‘त्या’ टिकाकाराला सेहवागची सणसणीत चपराक

महागुरु द्रविडचे मार्गदर्शन लाभलंय, मग चांगल्या फॉर्ममध्ये तर येणारच; पाहा कोण म्हणालं असं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---