---Advertisement---

भारतीय संघाचे कौतुक करण्याचा वसीम जाफरचा हटके अंदाज, मीमला दिले भन्नाट कॅप्शन

---Advertisement---

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने तिन्ही विभागात श्रीलंकेला नामोहरम केले. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे श्रीलंकेला ९ गडी गमावून २६३ धावाच करता आल्या. भारतीय गोलंदाजांनाही संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. संघाचे क्षेत्ररक्षण संपूर्ण सामन्यात दमदार राहिले. भारतीय क्षेत्ररक्षकांनी काही अफलातून झेल ही घेतले. भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर देखील युवा संघाच्या क्षेत्ररक्षणामुळे खूप प्रभावित झाला. त्याने एक मजेदार मीम शेअर करत कौतुक केले.

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात मिळवला विजय
या सामन्यात श्रीलंका संघाचे ९ पैकी ८ फलंदाज झेलबाद झाले. सूर्यकुमार यादव, हार्दिक आणि कृणाल पंड्या या क्षेत्ररक्षकांनीही संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण धावा वाचवल्या. भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार शिखर धवनने ८६ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याचवेळी वनडे पदार्पण करणाऱ्या इशान किशन (५९) आणि पृथ्वी शॉ (४३) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अखेरच्या षटकांत सूर्यकुमारने फटकेबाजी करत नाबाद ३१ भावा जोडल्या.

वसीम जाफरचे मजेदार ट्विट
या सामन्यातील भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाने प्रभावित झालेल्या वसीम जाफरने एक मीम शेअर केले. एका प्रसिद्ध मालिकेतील पात्राच्या तोंडी असलेला ‘well bro who the you the are this the?’ हा मजेशीर संवाद शेअर केला. याला त्याने प्रत्येक भारतीय क्षेत्ररक्षक श्रीलंकेच्या फलंदाजांना असे म्हणत असल्याचे दर्शविले.

आपल्या मजेदार ट्विटसाठी ओळखला जातो जाफर
भारतीय संघाचा माजी सलामीवीर असलेला वसीम जाफर हा ट्विटरवर वारंवार मजेदार मीम शेअर शेअर करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या ट्विटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असते. सध्या तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचा फलंदाजी प्रशिक्षक असून, नुकतीच देशांतर्गत हंगामासाठी त्याची ओडिशा क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंकाच काय, तर भारताचा ब संघ इंग्लंडलाही हरवेल; ‘त्या’ टिकाकाराला सेहवागची सणसणीत चपराक

महागुरु द्रविडचे मार्गदर्शन लाभलंय, मग चांगल्या फॉर्ममध्ये तर येणारच; पाहा कोण म्हणालं असं

बड्डेदिवशी मुलगा ईशानचे वनडेत अविस्मरणीय पदार्पण, वडिलांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---