मुंबई । इंग्लंडकडून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-2 ने पराभूत झाल्यानंतर, पाकिस्तानकडून कसोटी सामन्यांमध्ये चेंडूवर नियम बनविण्याची मागणी केली जात आहे. पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी गुरुवारी सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रिकेटमध्ये फक्त एका ब्रँडच्या चेंडूच्या वापरावर विचार केला पाहिजे. कारण वेगवान गोलंदाजांना जगभरातील वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्यासाठी तडजोड करणे कठीण आहे.
नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौर्यावर पाकिस्तान क्रिकेट संघ ड्यूक चेंडूबरोबर खेळला, ज्यामध्ये त्यांना तीन कसोटी सामन्यांची मालिका 0-1 ने गमवावी लागली.
वकार युनूस यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या स्तंभात लिहिले की, “मी बर्याच वर्षांपासून ड्यूक चेंडूचा उत्तम समर्थक आहे. पण मला असे वाटते की संपूर्ण जगात फक्त एका ब्रँडचा चेंडू कसोटी क्रिकेटसाठी वापरला पाहिजे. कोणताही ब्रँड असला तरी फरक पडत नाही, पण आयसीसीने निर्णय घ्यावा. जगभरातील गोलंदाजांना वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू वापरुन समायोजित करणे कठीण आहे.”
“आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ड्यूक व्यतिरिक्त, कुकाबुरा आणि एसजी चेंडूचा वापर केला जातो. भारतीय संघ एसजी बॉल वापरतो, इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडीज ड्यूक बॉल वापरतात आणि इतर देश कुकाबुरा वापरतात. कोविड -१९ साथीमुळे चेंडू चमकण्यासाठी लाळ वापरण्यास आयसीसीने बंदी घातली आहे. लाळ वापरु न देणे हे दोन्ही संघांसमोर सर्वात मोठे आव्हान असे म्हटले जात होते. इंग्लंडमधील हवामान पाहता ही खरोखर मोठी समस्या होती असे मला वाटत नाही,” असेही वकार युनूस म्हणाले.
वकार युनूसची मागणी किती योग्य?
वकार युनूसची सर्वच कसोटी सामन्यांमध्ये एकच चेंडू वापरण्याची मागणी अयोग्य वाटते. वास्तविक, प्रत्येक देशाचे हवामान आणि परिस्थिती भिन्न आहे. भारतात कोरडे व निर्जीव खेळपट्ट्या आहेत तर ऑस्ट्रेलियामध्ये वेगवान खेळपट्ट्या आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक खेळपट्टीवर एक प्रकारचा चेंडू चालू शकत नाही. कदाचित म्हणूनच आयसीसीने अद्याप बॉलबाबत कोणतेही नियम तयार केलेले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानची पायाभरणी करणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा पणतू आहे आयपीएल संघाचा मालक
धोनीच्या निवडीबाबत माजी प्रशिक्षकाचे मोठे विधान; म्हणतात, गांगुलीची इच्छा…
इंग्लंडमधील हा क्रिकेटपटू जातीवादामुळे झाला होता आत्महत्या करण्यास प्रवृत्त
ट्रेंडिंग लेख –