पाकिस्तान क्रिकेट संघाचा विश्वचषक 2023 स्पर्धेतील प्रवास खूपच खराब राहिला. त्यांना उपांत्य फेरीत जागा मिळवता न आल्याने ते स्पर्धेबाहेर फेकले गेले. बाबर आझम याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना इंग्लंडविरुद्ध गमावला. यानंतर संघ अधिकृतरीत्या स्पर्धेतून बाहेर पडला. विश्वचषकातील पाकिस्तानचे खराब प्रदर्शन पाहून चोहोबाजूंनी संघ आणि कर्णधारावर टीकेची झोड उडाली आहे. आता संघाचे माजी दिग्गज खेळाडू रमीज राजा यांनी आगपाखड केली आहे. त्यांनी तिखट प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आई-बहीण एक करत आहेत.’
रमीज राजा (Ramiz Raja) यांनी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याला पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, खेळाडू चांगले प्रदर्शन करत नाहीयेत, यात बाबर काय करू शकतो. रमीज राजांनी त्यांच्या ‘रमीज स्पीक्स’ या युट्यूब चॅनेलवर चर्चा केली. रमीज राजांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि व्यवस्थेवर राग काढताना दिसले.
व्हिडिओत सुरुवातीला ते म्हणाले की, “जेव्हा नवीन चेंडूने तुम्ही विकेट घेणार नाहीत, जेव्हा तुम्ही महागडे ठरता, तेव्हा बाबर आझम काय नेतृत्व करणार. ते पुन्हा काही क्रिकेटपटूंना बोलावून बेठक घेतील आणि म्हणतील की, सांगा क्रिकेट कसे ठीक करायचे. तसेच, ते सांगितले, तर मग त्यांना क्रिकेट बोर्डात का ठेवले? त्यांचे एकच काम आहे की, गोंधळ घालणे आणि कर्णधार बदलणे, कोचिंग स्टाफ बदलणे, त्यांना वाटेल की, आम्ही एक मोठे पाऊल उचलले आहे आणि आता सर्वकाही ठीक होईल. मात्र, तो त्यांचा गैरसमज आहे.”
रमीज राजा असेही म्हणाले की, “जोपर्यंत तुमचे क्रिकेटवर प्रेम नसेल, तुमच्यात आवड नसेल, तोपर्यंत पाकिस्तानचे क्रिकेट एक इंचही ठीक होऊ शकत नाही. तुम्हाला स्वत:ला बदलावे लागेल. अशाप्रकारे बातम्या लीक करता ना, पाकिस्तान क्रिकेटची आई-बहीण एक करत आहेत, ते तुम्हाला बंद करायचे आहे. त्यानंतर क्रिकेट बोर्डाने बाबर आझमची चर्चा लीक केली. जो मुख्य निवडकर्ता आहे, त्याला त्याने बाबर आणि रिझवानविरुद्ध किती गरळ ओकली आहे.”
https://twitter.com/SharyOfficial/status/1723576219747115515
पुढे बोलताना राजा म्हणाले की, “क्रिकेटला नवे वळण घ्यायचे असेल, तर आपण 70वर्षांच्या म्हातार्याला सोबत घेणार का, ज्याला निवडीची काहीच माहिती नाही? पाकिस्तानचे क्लब क्रिकेट कोलमडले आहे. तिथे शिकवणारे लोक अगदी बेसिक असतात, ते राजकारण करतात. तुम्ही स्पाइक्स घालून क्लब मॅचमध्ये गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करू शकत नाहीत. आठवड्याच्या शेवटी क्लबचे मैदान टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या कंपनीला दिले जाते. कारण, यातून क्लबला पैसे मिळतात. संपूर्ण यंत्रणा आणि सर्व प्रथम क्रिकेट बोर्डाला ठीक करावे लागेल.”
पाकिस्तान क्रिकेट संघाची विश्वचषक 2023मधील कामगिरी पाहिली, तर त्यांनी 9 सामन्यांपैकी फक्त 4 सामने जिंकले. तसेच, 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. 8 गुणांसह त्यांनी पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी राहत स्पर्धेचा निरोप घेतला. (pakistani former cricketer ramiz raja angry on pcb after team s bad performance in world cup 2023 see video)
हेही वाचा-
आपल्या गोलंदाजीने वर्ल्डकप 2023 गाजवणारे टॉप 5 गोलंदाज, यादीत ‘तो’ एकटाच भारतीय; पाहा यादी
Top 5: सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराटचे वर्चस्व, यादीत रोहितही सामील; सगळेच खेळणार Semi Final