एकीकडे न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. दुसरीकडे भारताचा पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तान संघही बांगलादेश दौऱ्यावर गेला आहे. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात शुक्रवार रोजी (१९ नोव्हेंबर) ढाकाच्या शेर ए बांगला स्टेडियमवर पहिला टी२० सामना पार पडला. पाकिस्तानने ४ विकेट्स राखून सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या पराभवाचा खलनायक ठरलेला वेगवान गोलंदाज हसन अली याने संघाला हा सामना जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले. या सामन्यादरम्यान त्याने असा काही चेंडू फेकला, ज्याची क्रिकेटविश्वात चर्चा होते आहे.
या सामन्यादरम्यान हसन अलीने बांगलादेशविरुद्ध आपल्या पहिल्याच षटकात २१९ किलोमीटर दर ताशी वेगाने चेंडू फेकला असल्याची चर्चा आहे. जर त्याने खरोखरच या वेगाने गोलंदाजी केली असेल; तर आतापर्यंत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम मोडित निघाला असता. अख्तरने २००३ विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १६१.३ किलोमीटर दर ताशी वेगाने चेंडू टाकला होता. मग नक्की काय आहे चर्चेमागील सत्यता?
तर झाले होते असे की, सामन्यादरम्यान बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या डावादरम्यान हसन अली दुसरे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या या षटकादरम्यान गोलंदाजी मीटरने त्याच्या एका चेंडूचा वेग तब्बल २१९ किलोमीटर दर ताशी इतका दाखवला आणि त्याने १३६ मीटर दर ताशी वेगाने गोलंदाजी केल्याचे सांगितले.
@RealHa55an breaks @shoaib100mph record by bowling a 219kph delivery ????@BCBtigers what's up with that ball speed radar.
Congratulations @TheRealPCBMedia@TheRealPCB#BANvPAK pic.twitter.com/9pdUHGkcBz
— Vitamin Protein (@JSMubi) November 19, 2021
गोलंदाजी मीटरच्या या चूकीमुळे टीव्हीवरही चेंडूची गती २१९ किलोमीटर दर ताशी इतकी दाखवली गेली. यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. भारतात या सामन्यांचे टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण केले जात नाही. त्यामुळे भारतीय चाहत्यांना हा प्रसंग प्रत्यक्षात पाहता आला नाही. परंतु सोशल मीडियावर उडालेल्या चर्चांमुळे भारतीय चाहतेही चकित झाले आहेत.
https://twitter.com/DennisCricket_/status/1461624119846313984?s=20
दरम्यान हसन अलीने या सामन्यात आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताकडून दुसऱ्या टी२०त न्यूझीलंड चारीमुंड्या चीत, ‘हे’ ५ खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार
बॅटही तुटली अन् पुढच्या चेंडूवर विकेटही गेली! भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर ‘असा’ झाला निशम आऊट






