भारतीय संघाचे प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनी त्यांच्या लहानपणी खूप आर्थिक संकटाचा सामना केला होता. हे दोन्ही भाऊ अनेकदा बॅट उधार घेऊन क्रिकेट खेळायचे. तसेच दोन्ही भाऊ भूक लागली असताना केवळ मॅगी खाऊन पोट भरत.
मात्र, आज हार्दिक आणि कृणाल हे खूप यशस्वी क्रिकेटपटू आहेत. आयपीएलमधील अप्रतिम कामगिरीमुळे या दोघांना भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. सध्या मिळत असलेल्या बातमीनुसार, कृणाल आणि हार्दिक पंड्या यांनी मुंबईत एक आलिशान फ्लॅट खरेदी केला असून, ज्याची किंमत ३० कोटी रुपये आहे. ३८३८ स्क्वेअर फूटच्या या फ्लॅटमध्ये ८ बेडरूम आहेत. हा फ्लॅट रुस्तमजी पॅरामाउंट, मुंबई येथे असून, बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी देखील याच सोसायटीत राहतात.
घरामध्ये आहेत अशा सुविधा
एका प्रमुख वृत्तपत्राच्या बातमीनुसार, हार्दिक आणि कृणाल पंड्याच्या घरात जिम, गेमिंग झोनही आहे. तसेच या आलिशान फ्लॅटमध्ये खासगी जलतरण तलावही असेल. एवढेच नाही तर पंड्या बंधूंच्या अपार्टमेंटमध्ये एक खाजगी थिएटर देखील असणार आहे. लवकरच पंड्या बंधू वडोदराहून मुंबईला स्थलांतरित होऊ शकतात. पंड्या बंधू एकेकाळी ४००-५०० रुपये एका सामन्यातून कमावत असत. हे दोघेही आज भारताच्या अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी आहेत.
श्रीलंका दौऱ्यावर केली खराब कामगिरी
हार्दिक आणि कृणाल नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते. मात्र, हा दौरा त्यांच्यासाठी निराशाजनक राहिला. कृणाल दोन सामन्यात केवळ एक बळी घेऊ शकला. त्याने फलंदाजीत ३५ धावांचे योगदान दिले. हार्दिकने वनडे मालिकेत फक्त ९.५० च्या सरासरीने १९ धावा केल्या व दोन बळी मिळवले.
टी२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यानंतर, कृणाल कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या इतर ८ खेळाडूंनाही टी२० मालिकेतून बाहेर पडावे लागले. यामध्ये हार्दिकचाही समावेश होता. ९ खेळाडूंना गमावल्यामुळे भारतीय संघाने ५ खेळाडूंना टी२० मालिकेत पदार्पण करण्याची संधी दिली. याचा फायदा श्रीलंकेने घेतला आणि टी२० मालिका २-१ ने जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लिश क्रिकेटपटू टाकणार ऍशेसवर बहिष्कार? ‘हे’ आहे कारण
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पुन्हा जायचे असल्यास भारतीय संघाला करावे लागेल ‘हे’ काम
‘या’ तारखेला सुरू होऊ शकतो ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’चा दुसरा हंगाम