Neeraj Chopra Marriage :- ‘गोल्डन बॉय’ म्हणून ओळखला जाणारा भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये (Paris Olympic 2024) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात नीरजनं दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर भाला फेकला. त्यामुळे तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकलं.
नीरजला रौप्य पदक मिळाल्यानंतर त्याची आई (Neeraj Chopra Mother) सरोज देवी यांनी नीरजचं कौतुक केलं. नीरजला सुवर्णपदक जिंकता आले नाही, पण रौप्यपदकही काही वाईट नाही, अशी प्रतिक्रिया सरोज देवींनी दिली. तसेच सुवर्णपदक विजेत्या पाकिस्तानी भालाफेकपटू नदीमवरही स्तुतीसुमने उधळत त्यांनी चर्चा मिळवली. यावेळी सरोज देवी यांनी नीरजच्या लग्नाचाही विषय काढला.
नीरजच्या आईची इच्छा आहे की, त्याचे लग्न लवकर व्हावे. याबाबत बोलताना सरोज देवी म्हणाल्या की, “नीरजने त्यांना गेल्या ऑलिम्पिकनंतर सांगितले होते की, मला आत्ता लग्न करायचे नाही आणि देशासाठी खेळायचे आहे. पण आम्हा सर्वांची इच्छा आहे की, नीरजने लवकर लग्न करावे.” तसेच नीरजला जर कोणती मुलगी आवडत असेल तर त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न लावून देण्यास आपण तयार असल्याचेही सरोज देवी यांनी यावेळी सांगितले.
ऑलिम्पिक गेम्समध्ये नीरज चोप्राचे दुसरे पदक
दरम्यान नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. त्या ऑलिम्पिकमध्ये नीरजनं 87.58 मीटर भाला फेक करून सुवर्णपदक जिंकलं होतं. पण नीरजला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या सुवर्णपदकाला डिफेंड करता आलं नाही. फायनलमध्ये नीरजचे 4 फाउल झाले. असं असलं तरी नीरजनं 89.45 मीटर भाला फेकला, जो त्याचा ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम थ्रो आहे. हे ऑलिम्पिक गेम्समधील नीरजचे दुसरे पदक आहे. त्यानं पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भाला फेक करून अंतिम फेरी गाठली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
3 संघ ज्यांना आयपीएल 2025 पूर्वी आपले मुख्य प्रशिक्षक बदलण्याची आवश्यकता
“मला ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे” दिग्गज फिरकीपटूनं व्यक्त केली इच्छा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना मिळाले नित्कृष्ट दर्जाचे मेडल, पदकांचा रंग एका आठवड्यात उडाला!