---Advertisement---

विनेशला पदक मिळणार की नाही? पॅरिसमध्ये होणार सुनावणी, कोर्टानं अपील स्वीकारलं

---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अर्जावर आता शुक्रवारी (9 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. तिनं आपल्या अपात्रतेविरुद्ध CAS (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) मध्ये अपील दाखल केलं होतं, जे सुनावणीसाठी स्वीकारण्यात आलंय.

विनेशनं आपल्या अपीलमध्ये संयुक्त रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे. क्रीडा न्यायालयानं विनेशला सुनावणीसाठी तिचा वकील नेमण्यास सांगितलं आहे. या खटल्यासाठी भारत सरकारला वरिष्ठ वकील नियुक्त करण्याचीही मागणी करण्यात आली आहे, जो विनेशचं प्रतिनिधित्व करेल आणि तिला संयुक्त रौप्य पदक देण्याची मागणी केली जाईल. ही सुनावणी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता होणार आहे.

कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) ही जगभरातील खेळांसाठी तयार केलेली एक स्वतंत्र संस्था आहे. खेळाशी संबंधित सर्व कायदेशीर विवाद निकाली काढणं हे त्याचं काम आहे. 1984 मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संस्था लवादाद्वारे खेळाशी संबंधित वाद सोडवण्याचं काम करते. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉजेन येथे आहे आणि याची न्यायालयं न्यूयॉर्क, सिडनी आणि लॉजेन येथे आहेत. ऑलिम्पिक यजमान शहरांमध्येही तात्पुरती न्यायालये स्थापन केली जातात.

कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र घोषित केल्यामुळे ऑलिम्पिकमधील भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम सामन्याच्या काही तास आधी विनेशचं वजन 100 ग्रॅमनं जास्त असल्याचं आढळून आलं. विनेशला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण वजन जास्त असल्यामुळे अंतिम सामन्याच्या काही तास आधी तिला अपात्र ठरवण्यात आलं. अशा परिस्थितीत नियमांमुळे उपांत्य फेरीत विजय मिळवूनही तिचं पदक हुकलं. मात्र आता प्रकरण CAS कडे गेल्यानंतर विनेशच्या पदकाची आशा पुन्हा जागी झाली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटनं निवृत्ती जाहीर केली. तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

हेही वाचा – 

भारतीय संस्कार दाखवत श्रीजेशने जिंकली लाखो मने, विजयानंतर केलेली कृती चर्चेत
व्वाह..! भारताने हॉकीचे कांस्यपदक कोणाला केले समर्पित? नाव ऐकून वाटेल अभिमान
‘कांस्य’ पदकाचा हिरो, टीम इंडियाच्या ‘सरपंच’नं स्पेनविरुद्ध केला कहर!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---