पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट सुवर्ण पदक मिळवण्यासाठी केवळ एक पाऊल दूर आहे. तिने पात्रता फेरीसह, उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत शानदार खेळ दाखवत अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. विनेशचं विशेष काैतुक यासाठी करण्यात येत आहे की, मागील दीड वर्षाचा काळ तिच्यासाठी फारच संर्घाषाचा होता.
खरं तर, विनेश फोगटची कारकीर्द खूप वेगाने प्रगती करत असताना मागील दीड वर्ष तिच्यासाठी संघर्षमय होते. भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) तिला ऑलिम्पिक पात्रता फेरीत सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती गेल्या दीड वर्षांपासून आंदोलनाला बसली होती. डब्ल्यूएफआयने हे आरोप फेटाळले होते की विनेशचा प्रशिक्षक आणि फिजिओसाठी अर्ज शेवटची तारीख संपल्यानंतर आला होता. याशिवाय त्यांनी (WFI) चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग आणि संजय सिंग यांच्यावरही आरोप केला होता की, त्यांना ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. विनेशचा त्रास इथेच थांबला नाही कारण ती त्या 3 प्रसिद्ध कुस्तीपटूंमध्ये होती (विनेश, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक) ज्यांनी ब्रिजभूषण सिंगवर लैंगिक छळाचा आरोप करत त्याच्या विरोधात आंदोलन केले होते. या सर्व हालांचालींवर मात्र पंतप्रधान मोंदी शांतच होते. त्यावेळी त्यांनी खरं तर या प्रकरणावर बोलायला पहिजे होते, अशी सर्व जनतेकडून आशा होत्या. पण मोदी मात्र बघ्याची भूमिका घेतली.
वास्तविक, आता विनेश यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी फायनलसाठी पात्र ठरली आहे. जर विनेशने अंतिम सामना हरली तरी भारताला पदक मिळणार हे निश्चित झाले आहे. आशा स्थितीत आता पंतप्रधान मोदी तिचं अभिनंदन करणार का? या संबंधी सोशल मीडियावर मात्र तुफान मीम्सचा पाऊस पडत आहे. पाहा ते व्हिडिओ
Vinesh Phogat when Modi calls to congratulate herpic.twitter.com/gMSfW8Tcpm
— Vedant (@monalisandro) August 6, 2024
Modi ji : Hello…….
Vinesh phogat : pic.twitter.com/fuM94QHYBu
— Raja Babu (@GaurangBhardwa1) August 6, 2024
When PR teams ask him to call Vinesh Phogat to congratulate for her medal
Modi pic.twitter.com/2FLR6wwuWL
— Sai (@akakrcb6) August 6, 2024
Vinesh Phogat when Modi try to call her after the final for his PR stunt: pic.twitter.com/TQ4R3yDTQ7
— tasavvur (@thomashelby_obe) August 6, 2024
Modi ji : hello..
Vinesh Phogat : pic.twitter.com/izuvgwzbZh
— Anant (@_Aawarahun) August 6, 2024
तत्तपूर्वी विनेश फोगटने 50 किलो फ्रीस्टाइल गटात मैदानात उतरली होती. तिने तिचा पहिला सामना 16 च्या फेरीत खेळला, ज्यामध्ये तिचा सामना जपानच्या युई सुसाकीशी झाला. विनेशने युई सुसाकीचा 3-2 असा पराभव करत पुढील उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत विनेशचा सामना युक्रेनच्या ओक्साना लिवाचशी झाला. विनेशने ओक्सानाचा 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
त्यानंतर उपांत्य फेरीत विनेशचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुझमनशी झाला. विनेशने उस्नेलिसचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरी गाठून त्याने भारताचे पदकही निश्चित केले. आता विनेश सुवर्णपदकासाठी अंतिम सामना अमेरिकेच्या सारा हिल्डब्रँडशी खेळणार आहे.
हेही वाचा-
जंतर-मंतरबद्दल एक शब्द तोंडातून न निघालेले मोदी विनेश फोगटचं कौतूक कसं करणार?
“चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघासाठी….” तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सुंदरनं दिली प्रतिक्रिया
शेवटच्या 3 वर्षापासून रोहित शर्माचं क्रिकेटमध्ये वादळ…! आकडेवारी पाहून व्हाल थक्क