भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध सलग दुसरा टी20 सामना पराभूत झाला. यजमान वेस्ट इंडिजने 5 टी20 सामन्याच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारत संघाच्या या निराशाजनक कामगिरीमुळे क्रिकेट चाहते नाराज होऊन प्रतिक्रिया देत आहे. सोबतच भारतीय संघाचे अनेक माजी खेळाडू संघाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देत आहेत. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल याने देखील एक मोठे विधान केले आहे.
मागील वर्षी झालेल्या विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय संघाचे नेतृत्व टी20 क्रिकेटमध्ये हार्दिक करताना दिसतोय. अधिकृतपणे संघाचा कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती झाली नसती तरी, पुढील टी20 विश्वचषकात तोच भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या पाच सामन्यांच्या मालिकेत देखील त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आलेले. मात्र, पहिल्या दोन्ही सामन्यात त्याने घेतलेल्या काही निर्णयामुळे संघाला पराभूत व्हावे लागले. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना पार्थिव म्हणाला,
“दुसऱ्या सामन्यातील काही निर्णय हे अतिशय अनपेक्षित होते. हार्दिकची यात मोठी चूक आहे. मात्र, मला असे वाटते की हार्दिक आणि राहुल भाई यांच्या तितका समन्वय नाही. कदाचित त्याला राहुल भाईंचे हवे तसे सहकार्य मिळत नसेल. आयपीएलमध्ये नेहरा आणि हार्दिक यांच्यात योग्य समन्वय दिसून येतो. टी20 मध्ये तुम्हाला एका अधिक ऍक्टिव्ह प्रशिक्षकाची गरज असते.”
आयपीएलच्या मागील दोन हंगामात गुजरात टायटन्स हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. या संघाचा मुख्य प्रशिक्षक हा आशिष नेहरा असून, संघाने पहिल्याच वर्षी विजेते होण्याचा मान मिळवलेला. तर, यावर्षी देखील अंतिम सामन्यात त्यांचा अखेरच्या चेंडूवर पराभव झाला.
( Parthiv Patel Bold Statement On Hardik Pandya And Rahul Dravid Bond)
महत्वाच्या बातम्या-
क्रीडामंत्र्यांवर गांगुलींचा प्रभाव! अवघ्या पाच दिवसात बदलला निवृत्तीचा निर्णय
पाकिस्तान संघाविषयी रोहित काय म्हणाला, ज्यामुळे रितिकालाही नाही आवरले हसू, व्हिडिओ होतोय व्हायरल