---Advertisement---

हे काय रे भाऊ! हैदराबाद-कोलकाता सामन्यातील पंच पुरुष की महिला?, घ्या जाणून

On: रविवार, ऑक्टोबर 18, 2020 6:26 PM
---Advertisement---

रविवारी (१८ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालील सनरायझर्स हैदाराबाद आणि ओएन मॉर्गन कर्णधार असलेला कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने आले होते. या दोन्ही संघात आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा ३५वा सामना झाला. मात्र सामन्यादरम्यान खेळाडूंपेक्षा जास्त एका पंचाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या सामन्यात भारतीय पंच सुंदरम रवी आणि पश्चिम गिरीश पाठक हे अंपायरिंग (पंचगिरी) करत होते. दरम्यान पाठक लांब केसांसह ‘रॉकस्टार’ स्टाईल लूकमध्ये असल्याचे दिसून आले. खरं तर पाठक यांना फार पूर्वीपासूनच लांब केस ठेवायची आवड आहे.

मात्र त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कित्येक चाहत्यांना ते महिला पंच असल्याचे भासले. त्यामुळे संभ्रमात पडलेल्या चाहत्यांनी ट्विटरवर नक्की ते पुरुष आहेत का महिला असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ते सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहेत.

आपल्या रॉकस्टार लूकमुळे चर्चेत आलेले पाठक यापूर्वीही चर्चेचा विषय ठरले होते. २०१५ सालच्या विजय हजारे ट्रॉफीतील एका सामन्यात ते चक्क हेल्मेट घालून मैदानावर उतरले होते. त्यामुळे ते सामन्यादरम्यान हेल्मेट घालून अंपायरिंग करणारे पहिलेच भारतीय पंच ठरले. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले होते की, सुरक्षेसाठी त्यांनी हेल्मेट घातले होते.

https://twitter.com/_nazariyaan_/status/1317779157506379777?s=08.

https://twitter.com/followyoursport/status/709353780169433088

https://twitter.com/Punjabi48985797/status/1317788835728687104?s=19

https://twitter.com/BabuMal35535743/status/1317790344235216897?s=08

https://twitter.com/hasan000khan/status/1317786357364740097?s=08

https://twitter.com/SardesaiAnuj/status/1317795356705345536?s=19

https://twitter.com/RahBhakt/status/1317782970212626432?s=08

१७ डिसेंबर १९७६ रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पाठक यांचा जन्म झाला होता. २०१४ साली त्यांनी आयपीएलमध्ये अंपायरिंग करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तब्बल ८ आयपीएल सामन्यात त्यांनी पंचाची भूमिका निभावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…म्हणून मी १९ व्या षटकात उनाडकटला गोलंदाजी दिली’, स्टिव्ह स्मिथने सांगितले कारण

धोनी-अंपायर वादावर हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने सोडले मौन, केले मोठे भाष्य

चेन्नईविरुद्ध विजयाचा हिरो ठरलेल्या ‘गब्बर’चा सुपर भांगडा, व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय

ट्रेंडिंग लेख-

आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---