क्रिकेट विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऍशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना बर्मिंघम येथे खेळला गेला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी (मंगळवार 20 जून) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 2 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत संघाचा विजय सोपा केला. त्याने फिरकीपटू नॅथन लायन याच्यासह नवव्या गड्यासाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, ही भागीदारी करताना भारतीय जोडीच्या विक्रमापासून बरेच दूर राहिले.
चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाला अखेरच्या दिवशी विजयासाठी 172 धावांची गरज होती. मात्र, पावसामुळे पाचव्या दिवशी पूर्ण एका सत्राचा खेळ वाया गेला. सामना अनिर्णीत होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, फलंदाजीची संधी मिळतात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वेगाने धावा बनवल्या. ऑस्ट्रेलिया विजयाकडे मार्गक्रमण करत असताना, इंग्लंडच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाची अवस्था 8 बाद 227 अशी केली.
केवळ दोन गडी बाकी असताना ऑस्ट्रेलियाला आणखी 54 धावा करणे गरजेचे होते. असे असताना कर्णधार कमिन्सने लायनला साथीला घेऊन अखेरपर्यंत किल्ला लढवला. दोघांनी नाबाद राहत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. कमिन्सने 44 तर लायनने अति महत्त्वाच्या 16 धावा केल्या.
कसोटी इतिहासात नवव्या गड्यासाठीची ही चौथी (55 धावा) सर्वोत्तम भागीदारी ठरली. या क्रमांकासाठी सर्वोत्तम भागीदारी करण्याचा विक्रम भारताचे व्हीव्हीएस लक्ष्मण व ईशांत शर्मा यांच्या नावे आहे. या दोघांनी 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीत 81 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीजच्या दुजा-बेंजामिन या जोडीने 1988 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 61 धावा केलेल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या कुल्टर व हेझलीट या जोडीने 1907 मध्ये इंग्लंडविरुद्ध 55 धावा नवव्या गड्यासाठी जोडलेल्या.
(Pat Cummins And Nathan Lyon Fourth Best Partnership For 9th Wicket Ashes 2023)
महत्वाच्या बातम्या –
महाराष्ट्र आयर्नमॅनचा आणखी एक थरारक विजय, गोल्डन ईगल्स यूपी संघावर १ गुणाने बाजी
ऑस्ट्रेलियाने फोडला इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’चा फुगा! ऍजबस्टन कसोटीत मिळवला थरारक विजय