रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स संघात आयपीएल २०२२मधील ६०वा सामना शुक्रवारी (दि. १३ मे) पार पडला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये झालेल्या या सामन्यात पंजाबने दिमाखात सामना आपल्या नावे केला. त्यांनी बेंगलोरला ५४ धावांनी मात दिली. या सामन्यात पंजाबच्या सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टो याने जोरदार फटकेबाजी केली. यादरम्यान त्याने ठोकलेल्या षटकारांची जोरदार चर्चा होत आहे. तसेच, यातील एका षटकाराचा व्हिडिओही जोरदार व्हायरल होतोय.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडून सलामीवीर जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याने विस्फोटक खेळी केली. पंजाबच्या डावाच्या दुसऱ्याच षटकात बेअरस्टोने गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या जोश हेजलवूडला चांगलाच चोप दिला. पहिल्या चेंडूवर एक धाव घेत शिखर धवनने स्ट्राईक बेअरस्टोकडे दिली होती. त्यानंतर बेअरस्टोने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. यानंतर मात्र, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर खणखणीत षटकार मारला. हा षटकार पाहून विराट कोहली (Virat Kohli) देखील हँग झाला यानंतर शेवटच्या चेंडूवरही त्याने चौकार झळकावला.
बेअरस्टोने मारलेल्या षटकारांमधील चौथ्या चेंडूवरील पहिला षटकार हा ९१मीटरचा, तर पाचव्या चेंडूवरील षटकार हा ९४मीटरचा होता. एकूणच बेअरस्टोने हेजलवूडला ४-६-६-४ अशी फटकेबाजी केली. त्याने मारलेल्या या षटकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जॉनी बेअरस्टोची हंगामातील कामगिरी
बेअरस्टोने या सामन्यात पंबाजविरुद्ध २९ चेंडूत ६६ धावा चोपल्या. यामध्ये ४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्याच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर बेअरस्टोने या हंगामात पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला होता. यामध्ये त्याला केवळ ८ धावाच करता आल्या होत्या. यानंतर मुंबई आणि हैदराबाद संघाविरुद्ध प्रत्येकी १२ धावा केल्या. दिल्लीविरुद्ध त्याला ९ आणि चेन्नईविरुद्ध ६ धावाच करता आल्या. यानंतर तो लखनऊविरुद्ध ३२ धावा करत त्यानंतर गुजरातविरुद्ध फक्त १ धावेवर तंबूत परतला. यानंतर मात्र, त्याने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. यासोबतच तो फॉर्ममध्ये परतला. एकूणच बेअरस्टोने या हंगामात ९ सामने खेळताना २२.४४च्या सरासरीने २०२ धावा चोपल्या आहेत. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे.
सामन्याचा आढावा
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत २०९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघाला निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १५५ धावाच करता आल्या. त्यामुळे पंजाबने हा सामना ५४ धावांनी खिशात घातला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी आणखी करू तरी काय?’, अवघ्या २० धावांवर तंबूत परतताना विराटची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद; चाहतेही दु:खी