दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डने यावर्षीपासून त्यांची टी-20 लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला. या लीगमध्ये जगभारतील दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. आयपीएलमधील फ्रँचायझी मालकांनी या लीगमध्येही संघ खरेदी केले आहेत. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड काही दिवसांपूर्वी त्यांच्या खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नव्हते. मात्र, आता पीसीबीने त्यांचा खेळाडूंना यी सीएशए टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे, असे समोर येते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीने मागच्या काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेत त्यांचा खेळाडूंची चिंता वाढवली होती. पीसीबीने सांगितल्यानुसार त्यांचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेतील टी-20 लीग म्हणझेच सीएसए टी-20 लीगमध्ये खेळणार नाहीत. मात्र आता पीबीसीने हा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत आहे. बोर्डाकडून अजून या निर्णयाची घोषणा केली गेली नसली, तरी त्यांच्या एका विश्वसनीय सूत्राकडून महत्वाची माहिती मिळाली आहे.
बोर्ड यापूर्वी खेळाडूंना या विदेशी लागसीठी नाहरकत (NOC) प्रमाणपत्र देत नव्हते. पण आता बोर्ड खेळाडूंना हे प्रमाणपत्र देणार असल्याचे समोर येत आहे. सीएसए टी-20 लीगमध्ये खेळणाऱ्या अधिकांश संघांची मालकी भारतीयांकडे आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिका पुढे ढकलली गेल्यानंतर पीसीबीने स्वतःचा निर्णय बदलल्याचे समजते. आता खेळाडूंना नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी बोर्डाला कुठलीही हरकत नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
पीबीसीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “राष्ट्रीय संघासोबत करार असेलले आणि संघासोबत करारबद्द नसलेले खेळाडू आता दक्षिण आफ्रिका आणि इतर टी-20 लीगसाठी उपबद्ध राहू शकतात.” पाकिस्तान संघ टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. पाकिस्तानचे विश्वचषकातील प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेतून जवळपास बाहेर फेकला गेला आहे. दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्दची टी-20 मालिका पाकिस्तान संघाला पुढच्या वर्षी म्हणजेच 2023च्या जानेवारी महिन्यात खेळायची होती. सद्या या ही मालिका 2024च्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये आयोजित केली जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मॅक्सवेलने वाचवली ऑस्ट्रेलियाची इभ्रत! 46 मीटरवरून केला सामना बदलणारा थ्रो; पाहा व्हिडिओ
पाच चेंडूंची ओव्हर? ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान सामन्यात पंचांकडून झाली मोठी चूक