पाकिस्तान क्रिकेट संघाचा विश्वचषक 2023 स्पर्धेतील प्रवास खूपच खराब राहिला. त्यांना उपांत्य फेरीत जागा मिळवता न आल्याने ते स्पर्धेबाहेर फेकले गेले. बाबर आझम याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना इंग्लंडविरुद्ध गमावला. विश्वचषकातील पाकिस्तानचे खराब प्रदर्शन पाहून चोहोबाजूंनी संघ आणि कर्णधारावर टीका होत आहे. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) मोठ्या निर्णयाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
विश्वचषकात सहभागी होताना क्रमांक दोनचा संघ म्हणून सहभागी झालेल्या पाकिस्तानला उपांतभेद प्रवेश करता आला नाही. खेळाच्या तिन्ही विभागात पाकिस्तानने अत्यंत सुमार खेळे केला. आशिया चषकापाठोपाठ विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचू न शकल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये आता महत्त्वाचे बदल होताना दिसण्याची शक्यता आहे.
पीसीबी अध्यक्ष झाका अश्रफ यांनी पाकिस्तान संघ माहिती परतल्यानंतर तडकाफडके बैठक घेतली. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खान याला आमंत्रित केले होते. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार,
‘पीसीबी सपोर्ट स्टाफमधील आपल्या सर्व विदेशी प्रशिक्षकांना नारळ देणार आहे. यामध्ये संचालक मिकी आर्थर, मुख्य प्रशिक्षक ग्रॅंट ब्रॅडबर्न व फलंदाजी प्रशिक्षक ऍंड्र्यू पुटीक यांचा समावेश आहे. तर गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल याने विश्वचषकानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.’
मॉर्केल याच्या जागी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर याला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून संधी मिळू शकते. तर, कर्णधार बाबर आझम याच्या भविष्याविषयी देखील लवकरच निर्णय घेतला जाईल. कसोटी क्रिकेटसाठी वेगळा कर्णधार व मर्यादित षटकांसाठी वेगळा कर्णधार असा विचारही पीसीबी करू शकते.
(PCB Might Fired All Of His Foreign Support Staff After ODI World Cup Chaos)
हेही वाचा-
IND vs NZ सेमीफायनलपूर्वी आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणतो, ‘ही तर फक्त एक दिवसाची…’
‘मान्य करावंच लागेल, सेमीफायनलमध्ये दबाव…’, कोच द्रविडचे न्यूझीलंडशी भिडण्यापूर्वी मोठे विधान