---Advertisement---

Champions Trophy; “आम्हाला लेखी आश्वासन…”, हायब्रीड मॉडेलसाठी पीसीबीची आयसीसीसमोर आणखी एक अट!

On: मंगळवार, डिसेंबर 10, 2024 10:17 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीसमोर सध्याचे सर्वात मोठे आव्हान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आहे. ज्याचे आयोजन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड करत आहे. पीसीबी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्यास तयार आहे. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या काही अटी आहेत. आयसीसीने पीसीबीच्या अटी मान्य केल्यास चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये हायब्रीड मॉडेलद्वारे होणार आहे. पीसीबीने आयसीसीसमोर कोणती अट ठेवली होती. हेही आता समोर आले आहे. भविष्यातील सर्व स्पर्धा विशेषत: भारता होणाऱ्या याच मॉडेलवर द्वारे आयोजित केल्या जातील याची खात्री त्यांना द्यावी, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. भारतात 2026 टी20 विश्वचषक (श्रीलंकेसह सह-यजमान) आणि 2029 ची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे.

जर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली गेली. तर 10 सामने पाकिस्तानमध्ये आणि पाच सामने दुबईमध्ये खेळले जाऊ शकतात. तीन भारतीय लीग, एक सेमीफायनल आणि फायनल दुबईमध्ये होणार आहे. भारतीय संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. तर अशावेळी सर्व बाद फेरीचे सामने पाकिस्तानमध्येच आयोजित करावेत. अशीही पाकिस्तानची मागणी होण्याची शक्यता आहे. मात्र आत्तापर्यंत जे वृत्त समोर येत आहे. त्यावरून असे दिसते की, अंतिम सामना दुबईत खेळवला जाऊ शकतो.

मीडिया रिपोर्ट्नुसार, “पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) जागतिक संस्थेकडून (ICC) भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या हायब्रीड मॉडेलबाबत भारताकडून लेखी आश्वासन हवे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत बुधवारपर्यंत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, एमिरेट्स क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीच्या निर्णयावर बारीक नजर ठेवून आहे. दुबईत भारताच्या सामन्यांचे यजमानपद जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे.

हेही वाचा-

गाबा मैदानावर आतापर्यंत हे 4 भारतीयचं शतक करण्यात यशस्वी, शेवटची सेंच्युरी 10 वर्षापूर्वी आलेली
केएल राहुलच्या जागी रोहितने सलामी करावी, या दोन दिग्गजांचा भारतीय कर्णधाराला सल्ला
नितीश रेड्डीने मोडला सेहवागचा विश्वविक्रम, फक्त 2 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत केला मोठा चमत्कार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---