भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन एक लोकप्रिय क्रिकेटर आहे. तो कोणत्याही ठिकाणी सामना खेळण्यासाठी जातो, तेव्हा त्या ठिकाणी त्याचे चाहते भेटायला येतात. जर त्याचे राज्य असलेल्या केरळबद्दल बोलायचे झाले तर ती गोष्ट निराळीच आहे. तो सध्या रणजी ट्रॉफीमध्ये केरळ संघाकडून खेळत आहे. यावेळी तिरुवनंतपूरममध्ये खेळताना त्याचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये संजू आपल्या पेंटिंगसमोर फलंदाजी करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या फोटोला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.
सध्या रणजी ट्रॉफीमध्ये केरळ आणि छत्तीसगड या संघात तिरुवनंतपूरममधील सेंट झेवियर्स कॉलेज ग्राऊंड येथे सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) केरळ संघाकडून खेळत आहे. या मैदानाच्या एका भिंतीवर त्याची पेंटिंग काढण्यात आली आहे. जेव्हा तो फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्या पाठीमागे त्याची पेंटिंग बघायला मिळत होती. अशातच त्याने समोर सरळ शॉट मारतानाच्या फोटोला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. रणजी ट्रॉफीच्या या सामन्यात त्याने पांढऱ्या रंगाची जर्सी घातली आहे, तर भिंतीवरील त्याची पेंटिंग भारतीय संघाच्या निळ्या जर्सीमध्ये आहे. या पेंटिंगच्या खाली सुपर सॅमसन असे इंग्रंजीमध्ये लिहिले आहे.
या सामन्यात सॅमसन केरळ संघाचे नेतृत्व करत आहे. यावेळी संजूने पहिल्या डावात 54 चेंडूत 46 धावा केल्या होत्या. त्याने आपल्या डावात तीन चौकार आणि 3 षटकार लगावले. केरळने आपल्या डावात सर्वबाद 311 धावा केल्या. याआधी छत्तीसगड संघाने आपल्या पहिल्या डावात 149 धावा केल्या होत्या.
श्रीलंकेविरुद्ध जानेवारीपासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेसाठी संजूची निवड झाली आहे. मात्र, त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळाले नाही. तो रणजी ट्रॉफीमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मागच्या सामन्यात त्याने राजस्थानविरुद्ध पहिल्या डावात 82 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात 69 धावांचे योगदान दिले होते. जयपूरमध्ये खेळवला गेलेला हा सामना अनिर्णित राहिला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेविरुद्ध भारत करणार नव्या वर्षाचे स्वागत! जाणून घ्या मालिकेचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर
सूर्यासाठी वर्षाचा शेवट गोड! भारताच्या टी20 उपकर्णधार पदानंतर मिळाले आयसीसी पुरस्काराचे नामांकन