ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने या फलंदाजांमुळे आव्हान आणखी कठीण झाले असल्याचे म्हटले आहे. यासोबतच कुलदीपने सांगितले की, २०१८-१९ च्या दौऱ्यावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे कारण विरुद्ध संघ कमकुवत नसून भारताची चांगली कामगिरी होती.
आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सच्या वेबसाईटशी बोलताना कुलदीप म्हणाला, “मालिका जिंकण्यासाठी तुम्हाला कसोटी सामना जिंकावा लागतो. जेव्हा तुम्ही कोणत्याही संघाविरुद्ध खेळता, तेव्हा तुमच्या संघाची कामगिरी महत्त्वाची असते.”
“त्यामुळे इतर संघात कोण आहे कोण नाही, हे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या संघाबद्दल चर्चा करा. आम्ही चांगली कामगिरी केली. त्यामुळे आम्ही २०१८-१९ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली. आमची वेगवान गोलंदाजी चांगली आहे आणि आम्ही त्याच प्रकारे फलंदाजीही करतो, ज्याप्रकारे आधी केली होती. त्यामुळे आम्ही यावेळीही जिंकणार,” असे कुलदीप म्हणाला.
पुढे बोलताना तो म्हणाला, “वॉर्नर, स्मिथ आणि लॅब्यूशाने यांच्यामुळे ऑस्ट्रेलिया संघात आणखी सुधारणा झाली आहे. परंतु मागील वेळीही त्यांचा संघ चांगला होता. त्यावेळी आम्ही चांगली कामगिरी केली होती. पुन्हा एकदा या आव्हानासाठी आम्ही तयार आहोत. ही चांगली स्पर्धा असेल.”
सन २०१८-१९ च्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ने पराभूत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मैदानात पुन्हा येणार ‘हिटमॅन’चं वादळ! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित होणार आज रवाना
काय सांगता! आजच्या दिवशी झाला होता कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिला सामना ‘टाय’
सावधान! ‘हे’ तीन खेळाडू भारतीय संघासाठी ठरू शकतात धोकादायक, ‘मास्टर ब्लास्टर’ची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-