भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) 35व्या वाढदिवशी कोलकाताच्या इडन गार्डन्सवर इतिहास घडवला आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 37व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करताना शतक झळकावले आहे. त्याने हे शतक करत सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांची बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे, विराटने या शतकासह खास पराक्रम केला आहे.
विराटचा खास पराक्रम
विराट कोहली (Virat Kohli) याने या सामन्यात सलामीला फलंदाजी करताना 119 चेंडूत 100 धावांची शानदार शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. विराटने वाढदिवशी हे शतक ठोकताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो वाढदिवशी शतक ठोकणारा जगातील सातवा खेळाडू ठरला. हे त्याचे वनडे कारकीर्दीतील 49वे शतक आहे.
𝗛𝗨𝗡𝗗𝗥𝗘𝗗 in Kolkata for the Birthday Boy! 🎂🥳
From scoring his Maiden century in Kolkata to scoring his 4⃣9⃣th ODI Ton 👑💯#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvSA pic.twitter.com/pA28TGI4uv
— BCCI (@BCCI) November 5, 2023
विराटपूर्वी कुणी केलाय असा कारनामा?
विराटपूर्वी वाढदिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी पाहिली, तर त्यात अव्वलस्थानी न्यूझीलंडचा स्टार खेळाडू टॉम लॅथम (Tom Latham) आहे. त्याने 2022मध्ये हॅमिल्टन येथे 30व्या वाढदिवशी नेदरलँड्सविरुद्ध नाबाद 140 धावांची झंझावाती शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या स्थानी भारतीय महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. त्याने 1998मध्ये शारजाह येथे 25व्या वाढदिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 134 धावांची शतकी खेळी केली होती.
यानंतर यादीत तिसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा महान फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) आहे. त्याने 1998मध्ये पल्लेकेले येथे 27व्या वाढदिवशी पाकिस्तानविरुद्ध नाबाद 131 धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर चौथ्या स्थानी सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) असून त्याने 2008मध्ये कराची येथे 39व्या वाढदिवशी बांगलादेशविरुद्ध 130 धावा चोपल्या होत्या. पाचव्या स्थानी मिचेल मार्श (Mitchell Marsh) असून त्याने 2023 विश्वचषकातच 32व्या वाढदिवशी 121 धावा केल्या होत्या. यानंतर यादीत शेवटच्या स्थानी भारताचा माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) याचा समावेश आहे. त्याने 1993मध्ये जयपूर येथे 21व्या वाढदिवशी इंग्लंडविरुद्ध नाबाद 100 धावा केल्या होत्या.
वाढदिवशी वनडेत शतक झळकावणारे खेळाडू
140* – टॉम लॅथम, विरुद्ध- नेदरलँड्स, हॅमिल्टन, 2022 (30वा)
134 – सचिन तेंडुलकर, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया, शारजाह, 1998 (25वा)
131* – रॉस टेलर, विरुद्ध- पाकिस्तान, पल्लेकेले, 2011 (27वा)
130 – सनथ जयसूर्या, विरुद्ध- बांगलादेश, कराची, 2008 (39वा)
121* – मिचेल मार्श, विरुद्ध- पाकिस्तान, बंगळुरू, 2023 (32वा)
100* – विनोद कांबळी, विरुद्ध- इंग्लंड, जयपूर,1993 (21वा)
101*- विराट कोहली, विरुद्ध- दक्षिण आफ्रिका, 2023 (35वा)*
विशेष म्हणजे, विराट कोहली हा वाढदिवशी विश्वचषकात शतक ठोकणारा रॉस टेलर आणि मिचेल मार्श यांच्या नंतरचा तिसरा खेळाडू आहे. टेलरने 2011मध्ये पल्लेकेले येथे पाकिस्तानविरुद्ध 131 झंझावाती खेळी केले होते. तसेच, मार्शने बंगळुरूत (Players registering ODI hundreds on their birthdays Virat Kohli Sevent cricketer)
हेही वाचा-
‘मास्टर’ने गाठला ‘ब्लास्टर’! बर्थ डे दिवशी विराटचे स्वतःलाच शतकी गिफ्ट
अवघ्या आठ डावांमध्ये विराटची मोठी मजल, फक्त सचिन आणि रोहितला जवलेली कामगिरी दाखवली करून