शनिवारी (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संध्याकाळी भारतीय संघाचा दिग्गज माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर महान खेळाडूंसोबतच अनेक क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. मोदी यांनी धोनीला पत्र लिहिले की, “तुझ्यामध्ये भारताचा आत्मा झळकतो. जिथे युवकांचे भविष्य हे त्यांच्या कुटुंबाचे नाव ठरवत नसून ते स्वत: आपल्या पायावर उभे राहतात आणि आपले नाव कमावतात.”
धोनीनेही ट्वीट करत पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद दिला आहे. त्याने लिहिले की, “एक कलाकार, सैनिक आणि खेळाडूला कौतुकाची अपेक्षा असते. त्यांच्या परिश्रम आणि त्यागाची सर्वांना ओळख व्हावी असं त्यांना वाटत असते. तुम्ही दिलेल्या कौतुक आणि शुभेच्छांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.”
२०११ विश्वचषकातील अंतिम सामन्यातील विजयी षटकार नेहमी आठवणीत राहील
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पत्रात लिहिले की, “तू १५ ऑगस्टच्या दिवशी एक व्हिडिओ शेअर केला होता, जो एका उत्कट वादासाठी पुरेसा होता. १३० कोटी भारतीय चाहते नाराज आहेत. परंतु सोबतच मागील दीड दशकात तुम्ही भारतासाठी जे काही केले, त्यासाठी तुझे आभारीही आहेत.” त्यांनी पुढे लिहिले की, “कठीण परिस्थितीत तुझ्यावरील जबाबदारी आणि विशेषत: २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामना संपविण्याची आपली शैली, पिढ्या न पिढ्या लोकांच्या आठवणीत राहील.
तुझ्यातील शांत स्वभाव हे युवकांसाठी सर्वात मोठे उदाहरण
पंतप्रधान मोदी यांनी लिहिले की, “तुझी कारकीर्द आकडेवारीवरूनही पाहिली जाऊ शकते. तुझा समावेश भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये होतो. भारताला जगामध्ये अव्वल क्रमांक मिळवून देण्यात तुझी महत्त्वाची भूमिका राहिली आहे. क्रिकेट इतिहासात तुझे नाव जगातील सर्वोत्तम फलंदाज, कर्णधार आणि दिग्गज यष्टीरक्षकांमध्ये घेतले जाईल.” त्यांनी पुढे लिहिले की, “तू कोणती हेअरस्टाईल ठेवली होती, हे महत्त्वाचे नाही. परंतु विजय असो किंवा पराभव, तू नेहमीच शांतता बाळगली. हे देशाच्या युवकांसाठी सर्वात मोठे उदाहरण आहे.”
आपण कोठून आलो आहोत, हे खूप महत्त्वाचे नाही
“तुला फक्त एक खेळाडू म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. एका लहान शहरातून बाहेर पडत तू राष्ट्रीय स्तरावर किर्तीमान स्थापित केला. तू स्वत:चे नाव रोशन केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाला गौरव मिळवून दिला. मी सशस्त्र सैन्याशी असलेल्या आपल्या संघटनांचा विशेष उल्लेख करू इच्छितो. सैन्यातील लोकांमध्ये सामील झाल्याने तुला खूप आनंद झाला होता,” असे पंतप्रधान मोदी यांनी धोनीबद्दल लिहिले.
मोदी यांनी पुढे लिहिले की, “आपण कोणत्या दिशेने जात आहोत हे जेव्हा कळते, तेव्हा आपण कोठून आलो आहोत याला महत्त्व उरत नाही. तू हीच भावना दाखविली आणि अनेक युवकांना यामधून प्रेरित केले.”
https://twitter.com/msdhoni/status/1296362680580636672
कुटुंबाच्या त्याग आणि पाठिंब्याशिवाय काहीही शक्य नाही
“देशाबद्दल असलेली तुझी बांधिलकी कायम लक्षात राहील. मला आशा आहे की साक्षी आणि झिवा आता तुझ्याबरोबर अधिक वेळ घालवू शकतील. मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो कारण कुटुंबाच्या त्याग आणि पाठिंब्याशिवाय काहीही शक्य नाही,” असेही पंतप्रधान मोदी यांनी धोनीबद्दल बोलताना पुढे लिहिले.
पंतप्रधानांनी लिहिले की, “देशातील तरुण तुझ्याकडून व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात ताळमेळ कसे निर्माण करावे हे शिकतील. मी तुला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
-मी भारतात येईल की नाही माहित नाही, परंतू माझी मुलं मात्र भारताविरुद्ध क्रिकेट नक्की खेळतील
-आयपीएलपुर्वीच दिल्लीचे कोच रिकी पॉटींग व या खेळाडूमध्ये वाद; रिकी म्हणतो, हे करु देणार नाही
-कसोटीतून निवृत्तीनंतर धोनी रात्रभर होता व्हाईट जर्सीमध्ये, रात्रभर डोळ्यातून येत होतं पाणी
ट्रेंडिंग लेख-
-एमएस धोनीने विराट कोहलीला दिले हे ५ मॅच विनर खेळाडू
-सुरेश रैनाने खेळलेल्या ५ महत्त्वाच्या खेळी, ज्यामुळे त्याला भारतीय क्रिकेटमध्ये विशेष ओळख…
-आयपीएल २०२०: ३ खेळाडू त्यांच्या आयपीएल संघासाठी ठरु शकतात अत्यंत महागडे