कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या पाकिस्तान सुपर लीग २०२१ स्पर्धचा उर्वरित हंगाम अबू धाबीमध्ये खेळवला जात आहे. हि स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली असून, येत्या २४ जून रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. दरम्यान या स्पर्धेत सट्टेबाजीचा प्रकार उघडकीस आला आहे.
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचा अंतिम सामना मुलतान सुलतान विरुद्ध पेशावर जाल्मी या बलाढ्य संघांमध्ये खेळला जाणार आहे. या क्रिकेट सामन्यांवरुन हैद्राबादमध्ये सट्टेबाजी सुरू होती. याबाबत माहिती मिळताच सायबराबाद स्पेशल ऑपरेशन टीमने निजामपेट येथील एका घरावर छापा टाकला. यादरम्यान त्यांना ५ बुकिंना अटक करण्यात यश आले आहे. आरोपींकडून एक सट्टेबाजी बोर्ड, एक लॅपटॉप, ३३ मोबाईल फोन आणि २०.५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
तसेच सायबराबादचे पोलीस आयुक्त व्हीसी सज्जनार यांनी म्हटले की, “आरोपी सोमाना प्रधान याला अद्याप पकडण्यात
यश आले नाही. सोमाना प्रधान हा आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्यातील रहिवाशी आहे. तो आणि आणखी ५ लोक आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये ऑनलाईन बेटिंग करायचे.” (Police arrested five accused of cricket betting in Pakistan super league)
ही ऑनलाईन सट्टेबाजी लाईव्ह लाईन गुरू, क्रिकेट मजा, लोटस, बेट ३६५, बेट फेयर या ॲपचा वापर करून केली जात असे. साइबराबाद पोलिसांनी या प्रकरणात ५ आरोपींना अटक केली आहे. आरोपींची नावे पवन कुमार, सतीश राजू, त्रिनाथ, भास्कर आणि प्रसाद असे आहे. तसेच सोमाना प्रधान याचा शोध घेणे सुरू आहे. हे सर्व आरोपी आंध्रप्रदेश जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात राहतात.
कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली पाकिस्तान सुपर लीग २०२१ स्पर्धा, ९ जूनपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेतील सर्व सामने अबुधाबीमध्ये खेळवले जात आहेत. तसेच २४ जूनला या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
सोने दो मुझे… सेहवागने विलियम्सनच्या संथ फलंदाजीची उडवली खिल्ली, पाहून व्हाल लोटपोट
जेव्हा राखीव दिवशीही पावसाने केली होती फलंदाजी, भारताला संयुक्त जेतेपदावर मानावे लागले समाधान
लाईव्ह सामन्यात दर्शक देत होते न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना शिव्या, तपास लागताच काढलं स्टेडियमबाहेर