---Advertisement---

Video: आता सुट्टी नाय! चौथ्या दिवशीही तोच प्रकार, सिराजवर वर्णद्वेषी टीका; भारतीय संघाने थेट सामना थांबवला

---Advertisement---

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे खेळला जात आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी (९ जानेवारी) भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याबद्दल वर्णद्वेषी टीका केल्याची तक्रार केली होती. असे असले तरी रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी देखील प्रेक्षकांमधून पुन्हा अशीच टीका सिराजवर करण्यात आल्याची तक्रार भारतीय संघाने केली आहे. त्यासाठी काहीवेळ सामनाही थांबला होता.

रविवारी दुसऱ्या सत्रात सिराज बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता. यादरम्यान प्रेक्षकांमधून काही जणांनी त्याच्यावर वर्णद्वेषी टीका केली. यानंतर सिराजने खूपवेळ वाट न पाहाता याबाबत कर्णधार अजिंक्य रहाणेला माहिती दिली. रहाणेनेही घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पंचांकडे तक्रार केली.

भारतीय संघ सिराजच्या पाठीशी –

कर्णधार रहाणेने जेव्हा पंचांना याबाबत माहिती दिली. त्यावेळी संपूर्ण भारतीय संघ सिराजच्या पाठीशी उभा राहिलेला दिसला. मैदानावरील पंचं पॉल रायफल यांनी या प्रकरणाबाबत लगेचच सामनाधिकारी यांना माहिती दिली. त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना हे प्रकरण कळवले. त्यामुळे लगेचच सुरक्षा अधिकाऱ्यांनी जेथून सिराजवर टीका करण्यात येत होती तिथे जाऊन चौकशी केली आणि चार-पाच लोकांना पोलिसांनी स्टँडबाहेर नेले. या दरम्यान जवळपास १० मिनिटे खेळ थांबला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांमध्ये वर्णद्वेषी टीका करण्याबाबत काहीवर्षांपूर्वीही आरोप झाले आहेत. पण त्यानंतर मधल्या वर्षात अशा प्रकारे मर्यादा सोडून कोणतीही घटना झाली नव्हती. मात्र आता पून्हा भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला वादाचे गालबोट लागले आहे.

https://twitter.com/sarcastiqlonda/status/1348129750334590976

काही चाहत्यांकडून विराटला चौथ्या कसोटीसाठी बोलवण्याची विनंती –

विराट कोहली सध्या पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतलेला आहे. मात्र सिडनी कसोटीत भारतीय खेळाडूंविरुद्ध प्रेक्षकांमधून करण्यात आलेल्या वर्णद्वेषी टीकेनंतर आता विराटला चौथ्या सामन्यासाठी परत बोलवा, अशी मागणी काही चाहत्यांनी केली आहे. यामागे विराटचा आक्रमकता असू शकते. कारण बऱ्याचदा अशा प्रकरणांमध्ये विराट आडून राहून त्याच्या भावना तीव्रपणे मांडतो.

पण असे असले तरी सध्या भारताचे नेतृत्व करत असलेला रहाणेने देखील या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत तक्रार केली आहे. तो कर्णधार म्हणून सिराज आणि बुमराहच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. त्याने सामना सुरु असतानाच खेळ थांबवण्यापर्यंत निर्णय घेतला, यावरुन रहाणेमधील नेतृत्वगुणही दिसून आला आहे.

भारतीय संघानेही सिराज आणि बुमराहच्या पाठीशी एकत्र उभे राहत एकतेचे आणि अशा अपमानास्पद गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, याचे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.

https://twitter.com/GauravK_8609/status/1348119175282135043

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे स्टेटमेंट –

शनिवारी भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्यांच्या खेळाडूंबद्दल अपमानास्पद टीका होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर रविवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदन जाहीर केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनात म्हटले आहे की प्रेक्षकांकडून करण्यात आलेल्या अपमानास्पद टीकेला कधीही सहन करण्यात येणार नाही. याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया कडक पावले उचलेल. याबरोबरच त्यांनी यजमान म्हणून भारतीय संघाची माफी मागितली असून अशा गोष्टी होणार नाहीत, याची काळजी घेऊ असे सांगितले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान ठेवले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---