महिला टी20 विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यातून वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर बाहेर झाली आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाणेफेकीदरम्यान सांगितलं की, पूजा वस्त्राकर दुखापतीतून सावरत आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक बदल केला. भारतीय संघात दुखापतग्रस्त पूजा वस्त्राकरच्या जागी संजीवन सजनाचा समावेश करण्यात आला आहे. तर पाकिस्ताननं डायना बेगच्या जागी अरुब शाहचा अंतिम अकरा खेळाडूंमध्ये समावेश केला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पूजा वस्त्राकरनं गोलंदाजी केली होती. मात्र तिनं केवळ एक षटक टाकलं. पूजानं या षटकात नऊ धावा दिल्या होत्या. तर फलंदाजी करताना तिनं 7 चेंडूंत 8 धावा केल्या.
पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना नाणेफेकनंतर म्हणाली, “आम्ही चांगली धावसंख्या करून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. या सामन्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं सांगितलं की, “आम्हीही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. आमच्याकडे चांगली संधी आहे. ती म्हणाली की, संघात बदल होत आहे. पूजा खेळत नाहीये. ती म्हणाला की आम्हाला फक्त सकारात्मक क्रिकेट खेळायचं आहे.”
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे
भारत – स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना आणि रेणुका सिंग
पाकिस्तान – मुनिबा अली (यष्टीरक्षक), गुल फिरोझा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, अरुब शाह आणि सादिया इक्बाल
हेही वाचा –
धोनी की रोहित, चांगला कर्णधार कोण? अवघड प्रश्नावर वर्ल्ड कप विजेता गोंधळला!
टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा संताप! एअर इंडियावर उघडपणे व्यक्त केला राग
सूर्याच्या झेलने नाही तर रिषभ पंतने भारताला विश्वचषक जिंकून दिला; रोहित शर्माचा धक्कादायक खुलासा