आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्स संघाची कामगिरी समाधानकारक होताना दिसत आहे. पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांपैकी चार सामने जिंकले असून, तीन सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले आहे. त्याचवेळी या हंगामात कर्णधार म्हणून नियुक्त केला गेलेला शिखर धवन मागील तीन सामन्यांपासून दुखापतग्रस्त असल्याने खेळू शकलेला नाही. त्याचवेळी पंजाबची संघ मालकीण असलेली अभिनेत्री प्रिती झिंटा हिने शिखरचे कौतुक केले आहे.
मागील वर्षी पंजाब किंग्सने शिखर धवनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. त्यानंतर या हंगामात त्याच्याकडे संघाची जबाबदारी देण्यात आली. त्याच्या नेतृत्वात पंजाब ने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवत चांगली सुरुवात केली होती. मात्र, चौथ्या सामन्यानंतर त्याला दुखापत झाली. यामुळे तो सलग तीन सामने खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन हा नेतृत्व करताना दिसतोय.
शिखर धवन हा संघात किती महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे याबाबत संघ मालकीण हिने एका मुलाखतीत सांगितले. ती म्हणाली,
“संघाचा कर्णधार कसा असावा हे शिखर धवनला पाहून समजते. संघातील खेळाडूंना एका प्रायोजकाने स्पीकर्स दिले होते. मात्र, संघासोबत असलेल्या नेट बॉलर्सना स्पीकर्स दिले गेले नव्हते. त्यावेळी शिखर याने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्या खेळाडूंना देखील स्पीकर्स मिळाले. ही नक्कीच एक मोठी गोष्ट होती. आम्ही खूप भाग्यशाली आहोत की तसा कर्णधार भेटला आहे. एक व्यक्ती म्हणून तो सर्वोत्तम आहे.”
शिखर याची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात आले आहे. तो पुढील सामन्यासाठी उपलब्ध असू शकतो.
(Preity Zinta Praising Words For Punjab Kings Captain Shikhar Dhawan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारला का खेळवले होते? WTC फायनलसाठी संधी न मिळाल्याने होतेय चर्चा
GTvsMI । नाणेफेक जिंकून मुंबईची प्रथम गोलंदाजी, पण महत्वाचा खेळाडू सामन्यात बाहेर