---Advertisement---

ओळख एशिया कप २०१८ मधील ‘ब’ गटाची

---Advertisement---

आजपासून(१५ सप्टेंबर) १४ वी एशिया कप स्पर्धा सुरु होणार आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई आणि अबुधाबी येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेची सुरुवात साखळी फेरीपासून होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे सहा संघ सहभागी होणार आहेत. या सहा संघाची ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

यातील ब गटाची थोडक्यात ओळख-

ब गटातील संघ- श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान

असे होतील साखळी फेरीतील ब गटाचे सामने-

१५ सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – दुबई

१७ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – अबु धाबी

२० सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – अबु धाबी

ओळख संघाची-

श्रीलंका- आत्तापर्यंत झालेल्या सर्व १३ एशिया कप स्पर्धेत श्रीलंका संघ सहभागी झाला आहे. त्यांनी आत्तापर्यंत ५ वेळा विजेतेपद मिळवले असून एशिया कपमध्ये सर्वाधिक विजेतेपद मिळवणाऱ्या संघात ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

त्यांनी २०१४ मध्ये शेवटचा एशिया कप जिंकला आहे. तसेच श्रीलंकेने आत्तापर्यंत एशिया कपमध्ये सर्वाधिक ३५ विजय मिळवले आहेत.

श्रीलंकेने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वनडे मालिकेत पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करल्यानंतर पुढील दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे ते तीच लय एशिया कपमध्येही ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतील.

तसेच श्रीलंकेचा फिरकी आक्रमक धारदार असेल. त्यांनी खेळलेल्या शेवटच्या वनडे सामन्यात अकिला धनंजयाने २९ धावात ६ विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली होती. तसेच ते उपुल थरंगा आणि कुसल मेंडीसकडून वरच्या फळीत चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे.

मात्र दिनेश चंडीमलला या स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले आहे. तसेच श्रीलंकेच्या संघात लसिथ मलिंगाने पुनरागमन केले आहे. त्यामुळे त्याची कामगिरी कशी होते हे पहावे लागेल.

असा आहे श्रीलंकेचा संघ-

अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुसल परेरा, कुसल मेंडिस, उपुल थरंगा, दिनेश चंडिमल, दानुश्का गुनथिलका, थिसरा परेरा, दसुन शनका, धनंजय डि सिल्वा, अकिला धनंजया, दिलरुवन परेरा, अमिला अपोन्सो, कसून रजीथा, सुरंगा सकमल, दुश्मंथा चमिरा, लसिथ मलिंगा.

बांगलादेश- आत्तापर्यंत सर्वाधिक ५ वेळा एशिया कप बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र तरीही आत्तापर्यंत एकदाही बांगलादेशला विजेतेपद मिळालेले नाही. त्यांनी दोनवेळा अंतिम फेरी गाठली आहे.

ते २०१२ आणि २०१६ च्या एशिया कपचे उप विजेते आहेत. असे असले तरी ते ब गटातील वरच्या क्रमवारीतील संघ आहेत त्यामुळे त्यांच्याकडून सर्वांनाच अपेक्षा असतील.

बांगलादेश संघाने नजीकच्या काळात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली प्रगती केली आहे. तसेच त्यांचा क्रिकेटपटू तामिम इकबाल चांगल्या लयीत आहे. नुकत्याच विंडीजने विरूद्ध झालेल्या द्विपक्षीय मालिकेत त्याने दोन शतके केली आहेत. तसेच त्याच्याबरोबर त्यांची वराची फळीही मजबूत आहे.
तसेच मुस्तफिझुर रेहमान चीही कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. याबरोबरच बांगलादेशला शकीब अल हसन लवकरच पूर्ण फिट असेल अशी अपेक्षा आहे. तो सुरवातीच्या सामन्याला मुकणार आहे.

असा आहे बांगलादेशचा संघ-

मशर्रफ मोर्ताझा (कर्णधार), शाकिब अल हसन, तमीम इक्बाल,  मोहम्मद मिथुन, लिटन दास, मुशफिकुर रहिम, अरिफुल हक, महमदुल्ला, मोसद्दीक हुसेन, मेहदी हसन, नाझमुल इस्लाम, रुबेल हुसेन, मुस्तफिजुर रहमान, अबू हैदर रोनी, नाझमुल हुसेन शान्तो, मोमिनुल हक.

अफगाणिस्तान – एशिया कपच्या इतिहासात अफगाणिस्तान दुसऱ्यांदा स्पर्धेत भाग घेत आहे. याआधी २०१४ मध्ये ते या स्पर्धेत सहभागी झाले होते.

बांगलादेश प्रमाणे त्यांचीही मागील काही वर्षांपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी झाली आहे. त्यामुळे तेही बांगलादेश, श्रीलंका संघाला पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज आहेत.

तसेच त्यांची गोलंदाजांची फळी भक्कम आहे. त्यांच्याकडे रशीद खान, मुजीब उर रेहमान, मोहम्मद नबी असे स्टार क्रिकेटपटू आहेत. मात्र त्यांची कमकुवत फलंदाजी त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.

असा आहे अफगाणिस्तानचा संघ-

असघर अफगाण (कर्णधार), मोहम्मद शहझाद, इहसानुल्लाह जनत, जावेद अहमदी, रेहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद नबी, गुल्बादिन नायाब, रशीद खान, नजीबुल्लाह झादरान, मुजीब उर रहमान, आफताब आलम, सामीउल्लाह शेनवारी, मुनीर अहमद, सईद शिरझाद, शारफुद्दीन अशरफ, यमीन अहमदझाई.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-एशिया कप २०१८: एमएस धोनीच्या नावावर आहे हा खास विक्रम

-शुटींग वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भारताला शेवटच्या दिवशी तीन पदके

-दोन वर्षानंतर पुन्हा धडाडणार स्टेनगन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment