दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आयपीएल २०२१ स्पर्धेत जोरदार फॉर्ममध्ये होता. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. इतकेच नव्हे तर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत देखील त्याने गोलंदाजांचे कंबरडे मोडल्याचे दिसून आले होते. तरीदेखील शुक्रवारी (७ मे) विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्यात आला. त्यामध्ये पृथ्वी शॉ ला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
तसेच त्याची गर्लफ्रेंड देखील सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पृथ्वी शॉ आणि प्राची सिंग या दोघांमध्ये नातेसंबंध सुरू असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. या दोघांनीही अधिकृतरित्या जाहीर केले नसले तरीही ते अनेकदा एकमेकांच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना दिसून आले आहेत. तसेच आयपीएल दरम्यान ती दिल्लीचा सामना झाल्यानंतर पृथ्वी शॉचा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत होती.
आता तिचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती करीना कपूरच्या ‘अशोका’ चित्रपटातील ‘सन सना न सन’ या गाण्यावर बेली डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
येथे पाहा व्हिडिओ-
https://www.instagram.com/reel/COnGrUcHzcO/?igshid=poqqmcy927tk
तसेच या व्हिडिओवर अनेक युजर्स आपली प्रतिक्रियादेखील देत आहेत. यावर पृथ्वी शॉ देखील कमेंट करण्यापासून स्वतःला आवरू शकला नाहिये. त्याने देखील कमेंट करत ‘कातीलाना’ असे लिहिले आहे.
कोण आहे प्राची सिंग?
गेल्या काही महिन्यांपासून पृथ्वी शॉ प्राची सिंगला डेट करत असल्याच्या बातम्यांना उधाण येत आहे. प्राची सिंग ही अभिनय क्षेत्रात नवीनच आहे. तिने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात कलर्स टिव्ही शोमध्ये येणाऱ्या ‘उडान’ या मालिकेतून केली होती. तिने या मालिकेत वांशिका शर्माची भूमिका साकारली होती.
पृथ्वी शॉची आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
आयपीएल २०२१ स्पर्धेत युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. आयपीएल २०२१ स्पर्धा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या गुणतालिकेत १२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत ८ सामने खेळले. यात त्याने ६ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच पृथ्वी शॉने या ८ सामन्यात ३८ च्या सरासरीने ३०८ धावा केल्या होत्या. यात ८२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आईच सर्वकाही! आईमुळे घडलेले ५ महान क्रिकेटपटू
टीम इंडियात झाली अर्झन नागवासवालाची एंट्री, तब्बल ४६ वर्षांनंतर घडला ‘हा’ इतिहास