भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ काही दिवासंपूर्वी दुखापतग्रस्त झाला होता. इंग्लंडमध्ये रॉयल लंडन कप सुरू आहे. या स्पर्धेत शॉ नॉर्थऍम्पटनशायर संघासाठी चांगले प्रदर्शन करत होता. मोठ्या काळानंतर शॉ अगदी फॉर्ममध्ये खेळत असल्याचे पाहायला मिळत होते. पण अशातच त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची बातमी समोर आली. आता शॉ याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून चाहत्यांना बाबात माहिती दिली आहे.
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) मागच्या काही वर्षांपासून भारतासाठी खेळताना दिसला नाहीये. सततच्या सुमार प्रदर्शनामुळे त्याला संघातील आपली जागा गमवावी लागली, असे सांगितले जाते. त्याने भारतासाठी शेवटचा सामना जुलै 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर शॉ भारतीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप त्याला यश मिळाले नाही. दरम्यानच्या काळात इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याची कामगिरी अपेक्षित नव्हती. असे असले तरी, शॉ यावर्षीच्या रॉयल लंडन कपमध्ये नॉर्थऍम्पटनशायर संघासाठी चांगले प्रदर्शन करत होता.
मात्र, अशातच त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तो या स्पर्धेच्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शॉने गुडघ्याला झालेल्या दुखापतीबाबत माहिती दिली. त्याने शेअर केलेल्या फोटोत शॉच्या गुडघ्याला झालेली दुखापत पाहायला मिळत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा तुम्ही प्रगती करत असता, तेव्हा तुम्हाला हात देणारे खूप असतात. पण जेव्हा तुमच्या कारकिर्दीला उतरती कळा लागते, तेव्हा लोक तुम्हाला सोडून जातात.” शॉच्या या इंस्टाग्राम स्टोरीची चांगलीच चर्चा होत आहे.
![Pritvi Shaw Instagram Story](https://mahasports.in/wp-content/uploads/2023/08/Pritvi-Shaw-Instagram-Story-161x350.webp)
दरम्यान, रॉयल लंडन कपमध्ये शॉने सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये आपण जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले होते. चार डावांमध्ये त्याने 409 धावा केल्या होत्या. मालितेली तिसऱ्या सामन्यात त्याने 244, तर चौथ्या सामन्यात 125* धावांची खेळी केली होती. या वनडे कप स्पर्धेत शॉ आपल्या संघासाठी येणाऱ्या सामन्यांमध्येही महत्वपूर्ण भूमिका पार पाडू शकत होता. पण दुखापतीमुळे हे शक्य होऊ शकले नाही. 23 वर्षीय सलामीवीर फलंदाजाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द पाहिली, तर त्याने भारतासाठी 5 कसोटी, 6 वनडे आणि 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. या तिन्ही फॉरमॅटमध्ये शॉने संघासाठी अनुक्रमे 339, 189 आणि 0 धावांचे योगदान दिले आहे. (Prithvi Shaw shares a Instagram story with injured knee)
महत्वाच्या बातम्या –
हार्दिकची उपकर्णधारपदावरून हकालपट्टी? आशिया कप आणि वर्ल्डकपसाठी बीसीसीआयचा वेगळा विचार
सँटनरचा अविश्वसनीय झेल! व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘वाह बेटे मौज कर दी’