संपुर्ण नाव- रिशी धवन
जन्मतारिख- 19 फेब्रुवारी, 1990
जन्मस्थळ- मंडी, हिमाचल प्रदेश
मुख्य संघ- भारत, हिमाचल प्रदेश, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती-वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 17 जानेवारी, 2016, ठिकाण – मेलबर्न
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 18 जून, 2016, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 12, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/74
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 1, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/42
थोडक्यात माहिती-
-रिशी धवनचा भाऊ राघव धवन हा क्लब क्रिकेट खेळतो. धवनने क्रिकेटची सुरुवातच मध्यमगती गोलंदाजीने केली होती. त्याने पुढे-पुढे फलंदाजीवरही लक्ष देण्यास सुरुवात केली. तो मधल्या फळीतील फलंदाज आहे.
-धवनने 79 प्रथम श्रेणी सामन्यात 3702 धावा केल्या होत्या. यात 4 शतकांचा आणि 30 अर्धशतकांचा समावेश होता. त्याने एकूण 308 विकेट्सही घेतल्या आहेत.
-2008मध्ये धवन किंग्स इलेव्हन पंजाबचा भाग होता. त्यानंतर फिटनेसच्या कारणामुळे त्याला 5 वर्षे आयपीएलमधून बाहेर रहावे लागले होते. 2013मध्ये मुंबई इंडियन्सने आणि 2014मध्ये परत किंग्स इलेव्हन पंजाबने विकत घेतले होते.
-जानेवारी 2016मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यातून धवनने वनडेत पदार्पण केले. यावेळी अवघ्या 3 धावा आणि 5 षटकात एकही विकेट न घेता विस्मरणीय पदार्पण केले. त्याला त्यावेळच्या टी20त मालिकेत आणि टी20 विश्वचषकातही खेळायला मिळाले नव्हते.
-2015मध्ये त्रिपुराविरुद्ध रणजी ट्रॉफीत धवनने उल्लेखनीय कामगिरी केली होती. यावेळी त्याच्या 65 धावांनी संघाच्या एकूण 535 धावा करण्यास मदत केली. त्याने 93 धावा देत 9 विकेट्सही घेतल्या होत्या.
-2013-14 आणि 2014-15च्या रणजी ट्रॉफी हंगमात धवन हा संघातील सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू होता. त्याने प्रत्येकी 49 आणि 40 विकेट्स घेतल्या होत्या.