---Advertisement---

बुमराह-चहलमधील ही खास शर्यत जिंकणार कोण?

---Advertisement---

आज भारत विरुद्ध श्रीलंका संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे येथे तिसरा आणि शेवटचा टी20 सामना होणार आहे. या सामन्यात जर 11 जणांच्या भारतीय संघात युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहला संधी मिळाली तर या दोघांनाही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज बनण्याची संधी आहे.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत सध्या चहल आणि बुमराह हे दोघेही आर अश्विनसह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत. त्यामुळे आज यांच्यापैकी जो जास्त विकेट घेईल त्याला अश्विनला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवण्याची संधी आहे.

सध्या बुमराहने 44 टी 20 सामन्यांत 52 विकेट घेतल्या आहे, तर चहलने 36 टी20 सामन्यात 52 विकेट्स घेतल्या आहेत आणि अश्विनच्या नावावर 46 टी20 सामन्यात 52 विकेट्स आहेत. 

-आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज – 

52 विकेट्स – युजवेंद्र चहल (36 सामने)

52 विकेट्स – आर अश्विन (46 सामने)

52 विकेट्स – जसप्रीत बुमराह (44 सामने)

41 विकेट्स – भुवनेश्वर कुमार (43 सामने)

39 विकेट्स – कुलदीप यादव (21 सामने)

38 विकेट्स – हार्दिक पंड्या (40 सामने)

https://twitter.com/Maha_Sports/status/1215278062784241664

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---