जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढच्या हंगामासाठी अद्याप सात-आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, आयपीएलमधील संघांनी त्या हंगामासाठी रणनिती बनवायला आत्तापासून सुरुवात केल्याचे दिसते. ब्रेंडन मॅकलम इंग्लंड संघाचा प्रशिक्षक बनल्यानंतर रिक्त झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या मुख्य प्रशिक्षकपदावर नुकतीच चंद्रकांत पंडित यांची वर्णी लागली आहे. त्यानंतर आयपीएलमधील दुसरा संघ पंजाब किंग्सही आपले मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी फारकत घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
आयपीएलच्या इतिहासातील अपयशी संघांपैकी एक म्हणून पंजाब किंग्सकडे पाहिले जाते. २०१४ नंतर ते आयपीएल प्ले ऑफसाठी पात्र ठरले नाहीत. २०२० पासून या संघाचे मुख्य प्रशिक्षक हे भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे आहेत. मात्र, त्यांच्यासारख्या दिग्गजाची जादूही संघावर चालली नाही. मागील चार वर्षापासून पंजाब संघ दरवेळी थोडक्यात प्ले ऑफपर्यंत जाण्यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळेच आता ते कुंबळेंना नारळ देण्याच्या तयारीत असल्याची बातमी आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार,
“पंजाब किंग्स आपले मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासोबतचा करार वाढवण्यास इच्छुक नाही. यावेळी संघात अनेक टी२० स्पेशालिस्ट व मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असतानाही संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संघमालक व कार्यकारिणीने कुंबळे यांचा करार संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची संपूर्ण कार्यवाही झाली असून, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.”
कुंबळे यांना या पदावरून बाजूला करत त्यांच्या जागी इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार ओएन मॉर्गन, इंग्लंडलाच विश्वविजेते बनवणारे ट्रेव्हर बायलिस व अन्य एका माजी भारतीय क्रिकेटपटू यापैकी एकाची वर्णी लागू शकते, अशी चर्चा सुरू आहे. आगामी काही आठवड्यात पंजाब किंग्स आपल्या प्रशिक्षकाबद्दल निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेतही टीम इंडियाची बल्ले-बल्ले; पहिली वनडे १० गड्यांनी खिशात
खळबळजनक! रवी शास्त्रींवर टीम इंडियातील अनुभवी खेळाडूचे गंभीर आरोप
‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच