इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी (२१ सप्टेंबर) अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्स संघाला आव्हानाच्या अगदी जवळ येऊन पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांनी अवघ्या २ धावांनी सामना गमावला आहे. दरम्यान पंजाब किंग्स संघाचे क्षेत्ररक्षण सुरू असताना, पंजाबच्या खेळाडूने मैदानात असे काही मजेशीर कृत्य केले आहे; ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांकडून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. तसेच क्षेत्ररक्षण करताना देखील काही खेळाडूंनी अप्रतिम झेल टिपले. पंजाबचा कर्णधार केएल राहुल याने संजू सॅमसनला बाद करण्यासाठी यष्टीमागे अप्रतिम झेल टिपला. तसेच फेबियन एलेनने देखील लियाम लिविंगस्टनला बाद करण्यासाठी अविश्वसनीय झेल टिपला. तर याच संघातील निकोलस पुरणने एक साधा सोपा झेल सोडला.
तर झाले असे की, पंजाब संघाची गोलंदाजी सुरू असताना राजस्थान संघातील फलंदाजाने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो प्रयत्न फसला आणि चेंडू निकोलस पुरणजवळ गेला. निकोलस पुरण हा अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. त्याने आतापर्यंत बरेचसे अविश्वसनीय झेल टिपले आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी हा झेल टिपणे अवघड नव्हते. मात्र दुर्देवाने त्याच्याकडून हा झेल सुटला. तसेच झेल सुटल्यानंतर चेंडू काही त्याच्या हाती येत नव्हता. तो चेंडू पकडण्यासाठी चक्क एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्याप्रमाणे मैदानावर रेंगताना दिसून आला. याच मजेशीर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
— . (@Thalanikki) September 21, 2021
या सामन्यात पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्वीकार करत, राजस्थान रॉयल्स संघातील सलामीवीर फलंदाजांनी संघाला चांगलीच सुरुवात करून दिली होती. यशस्वी जयस्वालने ताबडतोड ४९ धावांची खेळी खेळी. तसेच महिपाल लोमरोर याने चौफेर फटकेबाजी करत अवघ्या १७ चेंडूंमध्ये ४३ धावांची खेळी केली. तर एविन लुईसने ३६ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर १८५ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी ताबडतोड सुरुवात करून दिली होती. केएल राहुलने ४९ तर मयंकने ६७ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी निकोलस पुरणने देखील ३२ धावांचे योगदान दिले. परंतु पंजाब किंग्स संघाला आव्हानाच्या अगदी जवळ येऊन पराभवाचा सामना करावा लागला. या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने २ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
असा विक्रम होणे नाही! आयपीएल इतिहासात कधीही न घडलेला पराक्रम, पंजाब-राजस्थान सामन्यात झाला
‘एकदम से वक्त बदल दिया’, राजस्थानने पंजाबच्या तोंडून विजयाचा घास हिरावल्याने मीम्सचा पडतोय पाऊस