---Advertisement---

या ३ संघांकडे आहेत २०१९ आयपीएलमध्ये खेळाडू खरेदीसाठी सर्वाधिक रक्कम

On: शुक्रवार, नोव्हेंबर 16, 2018 11:13 AM
---Advertisement---

मुंबई | भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या १२व्या हंगामाचे सर्वांना वेध लागले आहेत. याच १२व्या हंगामासाठी कालचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. कारण संघांना आपल्या ताफ्यात कोण ठेवायचे आणि कुणाला मुक्त करायचे याचा निर्णय घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता.

यात अनेक बदल काल दिसले. यानंतर सध्या कोणत्या संघाकडे नविन खेळाडू संघात घेण्यासाठी किती रक्कम आहे हे स्पष्ट झाले.

यात सर्वात कमी रक्कम आहे ती हैद्राबाद संघाकडे. या संघाकडे खेळाडूंच्या खरेदीसाठी ९.७० कोटी रुपये शिल्लक आहेत. तर पंजाब संघाकडे तब्बल ३६.२ कोटी रुपये शिल्लक आहे.

पंजाबने सर्वाधिक खेळाडूंना या हंगामात मुक्त केल्यामुळे त्यांच्याकडे मोठी रक्कम शिल्लक राहिली.

मुंबई इंडियन्सकडे १२.४० कोटी तर केकेआरकडे १५.१४ कोटी रुपये आहेत. ज्या संघाकडे जास्त रक्कम शिल्लक आहे ते नक्कीच मोठा खेळाडू संघात घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसतील.

कोणत्या संघाकडे किती रक्कम आहे शिल्लक- 

९.७०कोटी- हैद्राबाद

१०.४० कोटी- चेन्नई

१२.४० कोटी- मुंबई

१५.१४ कोटी- कोलकाता

१८.१५ कोटी- बेंगलोर

२१.४५ कोटी- राजस्थान

२५.५० कोटी- दिल्ली

३६.२० कोटी- पंजाब

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment